एक कॅबिनेट मंत्री आणि एक माजी मंत्री हॉस्पिटलमध्ये

A cabinet minister and a former minister in hospital : एक कॅबिनेट मंत्री आणि एक माजी मंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.

A cabinet minister and a former minister in hospital
एक कॅबिनेट मंत्री आणि एक माजी मंत्री हॉस्पिटलमध्ये  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • एक कॅबिनेट मंत्री आणि एक माजी मंत्री हॉस्पिटलमध्ये
  • कॅबिनेट मंत्री एम्समध्ये दाखल
  • माजी मंत्री मेयोमध्ये

A cabinet minister and a former minister in hospital : एक कॅबिनेट मंत्री आणि एक माजी मंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण दिल्लीच्या एम्समध्ये (All India Institute Of Medical Sciences - AIIMS) दाखल आहेत. तर महाराष्ट्राचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे दाखल आहेत.

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण 63 वर्षांच्या आहेत. आज (सोमवार 26 डिसेंबर 2022) सकाळी त्या दिल्लीच्या एम्समध्ये दाखला झाल्या आहेत. वैद्यकीय तपासणी करून घेण्यासाठी अर्थमंत्री एम्समध्ये दाखल झाल्या आहेत. चिंतेचे कारण नाही, हे रुटिन चेकअप आहे; असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे अधिकारी सांगत आहेत.

महाराष्ट्राचे माजी महसूलमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात 69 वर्षांचे आहेत. आज (सोमवार 26 डिसेंबर 2022) मॉर्निंग वॉक करत असताना सेमिनरी हिल्स परिसरात पाय घसरून पडल्यामुळे थोरातांच्या उजव्या हाताचे हाड मोडले. यानंतर बाळासाहेब थोरात यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

बाळासाहेब थोरात यांचे सिटी स्कॅन तसेच एमआरआय करण्यात आले. यात त्यांच्या उजव्या हाताचे हाड मोडल्याचे लक्षात आले. उपचारांसाठी बाळासाहेब थोरात नागपूरच्या मेयोमध्ये दाखल झाले आहेत. 

नातलगांनी पुढील उपचारांसाठी बाळासाहेब थोरात यांना मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मेयोमधून डिस्चार्ज घेऊन बाळासाहेब थोरात यांना विमानाने मुंबईच्या हॉस्पिटलला आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. मेयोमधून मुंबईसाठी रवाना होण्याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी