VIDEO: क्रेन कोसळून ११ जणांचा मृत्यू 

Crane collapses: क्रेन कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. विशाखापट्टणममधील हिंदुस्थान शिपयार्ड येथे हा अपघात घडला आहे. 

crane collapses at Hindustan Shipyard Limited in Visakhapatnam Andhra Pradesh
क्रेन कोसळून अपघात  |  फोटो सौजन्य: ANI

आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम (Visakhapatnam)मधील हिंदुस्थान शिपयार्ड (Hindustan Shipyard Limited) येथे क्रेन कोसळून (Crane collapses) मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात ११ कामगारांचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला असल्याचं वृत्त एएनआय न्यूज एजन्सीने दिलं आहे. क्रेन कोसळताच एकच गोंधळ उडाला.

एएनआय न्यूज एजन्सीने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे. या व्हिडिओत क्रेन कोसळत असल्याचं दिसत आहे. क्रेन कोसळल्यानंतर त्याखाली दबल्याने कामगारांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मदतकार्य मोठ्या वेगाने सुरू करण्यात आले. क्रेनखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी अपघात घडला त्या ठिकाणी अनेक कामगार काम करत होते. कामगार काम करत असतानाच अचानक क्रेन खाली कोसळून अपघात घडला. क्रेनखाली काही मजूर दबले गेले आणि यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी घटनास्थळी १८ हून अधिक कामगार काम करत होते. या क्रेन दुर्घटनेनंतर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी आणि शहर पोलीस आयुक्तांना अपघाताच्या घटनेवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

हा अपघात नेमका कसा झाला याचे कारण शोधण्यात येत आहे. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी कामगार तेथे काम करत होते आणि क्रेन कोसळताच तेथे गोंधळ उडाला. कामगारांचा आरडाओरड सुरू झाला. तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. या अपघातात दहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक जखमी कामगाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्या कामगाराचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी