उत्तरप्रदेश : केमिकल फॅक्टरीमध्ये स्फोट, ६ जणांचा मृत्यू 

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 12, 2018 | 16:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये नागिना रोडवर असलेल्या एका केमिकल फॅक्टरीमध्ये एक सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात ६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २ जण जखमी झाले आहेत.

cylinder blast in a chemical factory on Bijnors
मोहित केमिकल फॅक्टरीमध्ये एक सिलेंडरचा स्फोट  |  फोटो सौजन्य: ANI

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. बुधवारी सकाळी नागिना रोडवर असलेल्या मोहित केमिकल फॅक्टरीमध्ये एक सिलेंडरचा स्फोट झाल्याने ६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. केमिकल सिलेंडर खूप गरम झाला होता त्यामुळे त्या सिलेंडरचा स्फोट झाला आणि ही दुर्दैवी घटना घडली. जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

बिजनौर पोलिसांनी माहिती दिली की, कोतवाली शहर क्षेत्रान्तर्गत मोहित पेट्रो केमिकल फॅक्टरीमध्ये वेल्डिंग दरम्यान मिथेन गॅसची टाकी फुटल्याने ६ लोकांचा मृत्यू झाला तर २ जण जखमी झाले आहेत.बिजनौरचे जिल्हाधिकारी आणि बिजनौरचे  पोलीस अधिक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतांना आणि जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

 

 

आयएएनएसच्या माहितीनुसार, मृतकांमध्ये बालगोविंद, रवि, लोकेंद्र, विक्रांत, कमलबीर आणि चेतराम यांचा समावेश आहे. सर्व मृत कोतवाली देहात भागातले रहिवासी आहेत. दोन्ही जखमी कामगारांची तब्येत गंभीर असून एक कामगार बेपत्ता असल्याचं सांगण्यात येतं आहे. जखमींना तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी