मित्रासोबत प्रणय करणाऱ्या मुलीला तांत्रिकनं फेवीक्विकनं चिपकवलं, नंतर घेतला जीव

पोलिसांनी घटनेच्या लिंकला लिंक जोडून तांत्रिकाची कडक चौकशी केली आहे. चौकशीत तांत्रिकाने हत्येचे खरे कारण सांगितले. गोगुन्दा पोलिस अधिकारी योगेंद्र व्यासने माध्यमांना हत्येचे कारण सांगितले आहे. तांत्रिकला वाटत होतं की, त्यांची मुलगी त्याच्यापासून दूर जाईल. मुलगी त्याच्यापासून दूर जाईल हे हा विरह तो सहन करू शकत नव्हता. यामुळे त्याने दोघांचा खून केला. 

girl who was having a romance with a friend was pinned by Faviquik, then.
मित्रासोबत प्रणय करणाऱ्या मुलीला फेवीक्विकनं चिपकवलं,नंतर...   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तांत्रिक बाबाने तरुण-तरुणीला लैंगिक संबंध बनवताना पाहिले होते.
  • खून करण्यात आलेल्या युवकाचे नाव राहुल आहे.
  • लोकांची अशी श्रद्धा होती की, जर कोणी 1.25 लाख मोत्यांची माळ जपली तर बाबा प्रत्येक इच्छा पूर्ण करतात.

Udaipur Double Murder: प्रेम रसात बुडलेल्या युवक-युवतीला फेवीक्विकने (Feviquik) चिपकवून चाकू हल्ला करत त्यांचा खून करण्यात आला आहे. प्रणय  करत असल्याचे पाहून एका तांत्रिकाने त्यांच्यावर फेवीक्विक टाकून त्यांच्या चाकू हल्ला करत त्यांचा खून केला. ही घटना राजस्थानमधील उदयपुर येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (police) आरोपीला अटक केली आहे.  खून करण्यात आलेल्या युवकाचे नाव राहुल आहे, तर तांत्रिकाचे नाव भालेश कुमार आहे. युवकासोबत खून  झालेल्या मुलगी ही तांत्रिकाची मुलगी होती.(A girl who intimate with friend tantrik glued them with Feviquik then killed them) 

अधिक वाचा  : औरंगाबादमध्ये भीषण अपघात, तीन सख्ख्या भावंडांचा मृत्यू

दरम्यान पोलीस तपासात खून करण्याचे अनेक कारणे समोर आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तरुण आणि तरुणीला तांत्रिकाकडून मोहनी घालण्याची कला शिकायची होती. परंतु तांत्रिक बाबाने त्यांना ती कला शिकवली नाही. यामुळे या जोडप्याला राग आला मग त्यांनी गावात तांत्रिक बाबाची बदनामी करू लागले. यावर नाराज होत तांत्रिकने त्यांचा खून केल्याची सांगितलं जात आहे. त्याचबरोबर पोलिसांनी हत्येचं आणखीन एक कारण सांगितले आहे, पोलिसांच्यामते, तांत्रिक बाबाने तरुण-तरुणीला लैंगिक संबंध बनवताना पाहिले होते. त्यानंतर त्या बाबाने त्या मुला-मुलीच्या घरच्यांना यांची माहिती दिली. त्यानंतर तरुण-तरुणीने याचा राग मनात ठेवत बाबाची बदनामी करण्याचा निर्णय घेतला. त्या बदनामीच्या पोटी तांत्रिक बाबाने दोघांचा  खून केला. 

अधिक वाचा  : सरनाईकांनी 75 तोळे सोनं तुळजाभवानी मातेला केलं अर्पण

पोलिसांनी घटनेच्या लिंकला लिंक जोडून तांत्रिकाची कडक चौकशी केली आहे. चौकशीत तांत्रिकाने हत्येचे खरे कारण सांगितले. गोगुन्दा पोलिस अधिकारी योगेंद्र व्यासने माध्यमांना हत्येचे कारण सांगितले आहे. तांत्रिकला वाटत होतं की, त्यांची मुलगी त्याच्यापासून दूर जाईल. मुलगी त्याच्यापासून दूर जाईल हे हा विरह तो सहन करू शकत नव्हता. यामुळे त्याने दोघांचा खून केला. 

1.25 लाख मोत्यांची माळ जप करा, तर बाबाजी पूर्ण करतील सर्व इच्छा 

हत्येच्या या प्रकरणातील आरोपी हा तांत्रिक आहे हे आपल्याला माहिती आहे. या आरोपीचे नाव भालेश कुमार आहे.  क्षेत्र भादवी गुडात, शेष नाग बौजीच्या मंदिरात तो पूजा करत असायचा. त्याचबरोबर तो काळू जादू करत असायचा. पोलीस अधिकारी योगेंद्र व्यास यांनी सांगितले की, लोक त्याला खूप मानत असतं. लोकांची अशी श्रद्धा होती की, जर कोणी 1.25 लाख मोत्यांची माळ जपली तर बाबा म्हणजे ते स्वतः त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात.  अशाच एका भक्ताने 1.25 लाख मोत्यांची जपमाळ जपली होती, म्हणून त्याने शेष नाग व्यतिरिक्त आरोपी तांत्रिकाचे मंदिर मागितले. आरोपी बाबाने ते मंदिर त्या भक्ताला दिले.  

अधिक वाचा  : या शुक्रवारपासून वर्षातील सर्वात मोठा ‘ब्लॅक फ्रायडे’ से

राहुलनेही केला मंत्र जाप, पण... 

 खून झालेल्या राहुलने ही इतरांप्रमाणे मंत्र जाप सुरू केला आणि आपली मनातील इच्छा पूर्ण करण्याचा मानस ठेवला. त्याला कोणी तरी सांगितले होते की, 1.25 लाख वेळा मोती जपला तर बाबा आपली इच्छा पूर्ण करतात. ते ऐकून राहुल जप करू लागला. परंतु राहुल कोणती गोष्ट मागता राहुलचा तांत्रिक बाबाच्या मुलीवर डोळा होता.  राहुल हा विवाहित होता, परंतु त्याचे तांत्रिकच्या मुलीसोबत अनैंतिक संबंध होते आणि त्याला तांत्रिकच्या मुलीशी लग्न करू इच्छित होता. 


 
 जेव्हा राहुल नाम जाप करत होता, तेव्हा तेथील एका अनुयायाने राहुलला त्याची इच्छा विचारली. तेव्हा आपल्याला  तांत्रिकची मुलगी हवी आहे. ही माहिती त्या अनुयायीने तांत्रिक भालेशला दिली. आता नामजप पूर्ण झाल्यावर मला त्याची इच्छा पूर्ण करावी लागेल, अन्यथा भक्तांमधील आदर नष्ट होईल, अशी भीती तांत्रिकाला वाटत होती. या भीतीपोटी मंत्रोच्चार संपण्यापूर्वी राहुलला मारायचे होते. आता मुलीची हत्या का करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे, याचे उत्तरही तांत्रिकाने चौकशीदरम्यान सांगितले.

तांत्रिकाला तुरुंगात जाण्याची आणि बदनाम होण्याची भीती  

तांत्रिकाने आपली मुलगी गमावल्याची बाब कधीच समोर येऊ दिली नाही. तसेच अनैतिक संबंधाविषयी राहुलला काही म्हणाला नाही.  राहुलंचं कोणत्या मुलीशी अनैतिक संबंध असल्याने राहुल आणि त्याच्या पत्नीमध्ये भांडण होऊ लागली होती. यावर उपाय करण्यासाठी राहुलच्या घरच्यांनी बाबाकडे दाद मागितली. तांत्रिक बाबाकडे या गोष्टीवर उपाय मागितला. मग बाबाने राहुलच्या घरच्यांना त्याच्या आणि स्वत:च्या मुलीच्या नात्याविषयी सांगितले. 

यामुळे संतापलेल्या तरुणीने तांत्रिकाला धमकावणे सुरू केले की, आता मी सर्वांना सांगेन की, तू माझा हात धरलास, माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केलास, हे पोलिसांना सांगितले तर तुरुंगात जाशील. चारचौघात झालेलं तुझं नाव मी बदनाम करेल आणि तू  तुरुंगात जाशील. तरीही तांत्रिक त्या मुलीला समजवून सांगत होता. कारण त्यांच्या संबंधामुळे संसार उद्धवस्त होत होती. त्यानंतर राहुल आणि मुलीने शेवटची भेटण्याची इच्छा व्यक्त केली, त्यानंतर तांत्रिकने त्यांची हत्या केली. 

अशी केीली हत्या 

राहुल आणि मुलीला मारण्यासाठी तांत्रिकने मंदिरात  50 किलो फेवीक्विक गोळा करुन ठेवले.  तांत्रिक तावीज बनवायचा त्यामुळे कुणालाही त्याच्यावर शंका झाली नव्हती. दरम्यान तांत्रिकने 15 नोव्हेंबर रोजी मृत राहुलला सुखाडिया सर्कल येथेल मुलीला भेटण्याची परवानगी दिली. त्यांची भेट करून दिल्यानंतर आपण हे काम सोडून देणार असल्याचं तांत्रिकनं म्हटलं. त्यानंतर तांत्रिकने राहुलला आणि मुलीला घेऊन जंगलाकडे निघून गेला.

घटनास्थळी त्या दोघांनी शेवटचं लैंगिक संबंध करुन देण्याची मागणी केली. त्यानंतर तांत्रिकने बाजुला होता परवानगी दिली. जेव्हा ते दोघेही संबंध प्रस्थापित करू लागले तेव्हा बाबाने त्यांच्यावर फेवीक्विक टाकून त्यांना चिपकवून टाकले त्यानंतर चाकू भोसकून आणि दगडाने ठेचून त्या दोघांची हत्या केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी