Ghaziabad fire: गाझियाबादमध्ये झोपडपट्टीला भीषण आग, 100 गायींचा होरपळून मृत्यू

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाझियाबादमधील इंदिरापुरम (indirapuram) भागातील झोपडपट्टीला (hut) भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात 100 गायींचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. वास्तविक, आग एका झोपडपट्टीत लागली, जिथे भंगार रद्दीचे गोदामही होते आणि त्याच वस्तीला लागून असलेल्या गोशाळेत ही आग पसरली.

A huge fire broke out in a slum in Ghaziabad
गाझियाबादमध्ये झोपडपट्टीला भीषण आग  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • गाझियाबाद पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
  • अग्निशमन विभागाच्या सुमारे 15 गाड्यांच्या मदतीने एक तासात ही आग विझवण्यात आली.
  • गायी खुट्याला बांधलेल्या होत्या, आग वेगाने पसरल्याने गायी सोडणं अशक्य झालं.

Ghaziabad Fire News : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाझियाबादमधील इंदिरापुरम (indirapuram) भागातील झोपडपट्टीला (hut) भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात 100 गायींचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. वास्तविक, आग एका झोपडपट्टीत लागली, जिथे भंगार रद्दीचे गोदामही होते आणि त्याच वस्तीला लागून असलेल्या गोशाळेत ही आग पसरली. दुपारची वेळ होती, गाय खुंटीला बांधलेल्या होत्या. आग इतकी वेगाने पसरली की सर्व गायी सोडणं कठीण झाले आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात गायी जळून मृत्यूमुखी पडल्या.

सध्या गाझियाबाद पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यासोबतच प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले असून, जी झोपडपट्टी वसली, ती कोणत्या परिस्थितीत स्थापन झाली, हेही तपासण्यात येणार आहे.  कारण वस्तीत राहणारे लोक रद्दीचे काम करतात, असे आजूबाजूच्या लोकांचे म्हणणे आहे आणि तेथे रद्दीचे गोदामही होते. या संदर्भात अनेकवेळा पोलीस व प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. या आगीत गव्हाचे शेतही जळून खाक झाले आहे.

काय प्रकरण आहे

गाझियाबाद शहराचे एएसपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 1.10 च्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या सुमारे 15 गाड्यांच्या मदतीने एक तासात ही आग विझवण्यात आली. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, ही आग वस्तीपासून सुरू झाली आणि नंतर या वस्तीला लागून असलेल्या गोशाळेत पसरली.. मृत्युमुखी पडलेल्या बहुतांश गायी बांधलेल्या होत्या, त्यामुळे त्या निघू शकल्या नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी गोशाळेत एक कर्मचारी उपस्थित होता, त्याने इतर काही लोकांच्या मदतीने काही गायीही सोडल्या. तर सुमारे 20 गायी जखमी झाल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याशिवाय येथे काही सिलिंडर होते, त्यांचाही स्फोट झाल्याने आग आणखीनच वेगाने पसरली आहे.

गोशाळा चालक काय म्हणाले

गोशाळेचे संचालक सूरज पंडित सांगतात की, त्यांना दुपारी फोनवरून गोशाळेत आग लागल्याची माहिती मिळाली. त्यावेळी गोठ्यात एक कामगार उपस्थित होता, त्याने आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने गायी सोडल्या, मात्र आग इतकी वेगाने पसरली की सर्व गायी सोडणे कठीण झाले आहे. सूरजच्या म्हणण्यानुसार, गोशाळेत जवळपास 100 गायी होत्या. या अपघातात 40 जणांचा मृत्यू झाला आहे. या झोपडपट्टीत रद्द भंगाराचे गोदामही बांधण्यात आले असून, यासंदर्भात अनेकवेळा पोलीस आणि प्रशासनाकडे तक्रार केल्याचेही सूरजने सांगितले. पण काहीही झाले नाही. या कचऱ्यामुळे ही आग लागली आहे. सूरजच्या म्हणण्यानुसार, तो जवळपास १५ वर्षांपासून गोशाळा चालवत असून या गोशाळेची जागा त्याने भाड्याने घेतली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी