Mumbai Airport: मुंबई विमानतळावरील मोठा अपघात टळला, ट्रॉली ओढणाऱ्या ट्रॅक्टरला लागली आग

मुंबई विमानतळावर (Mumbai airport) सोमवारी होणारा मोठा अपघात (Accident) टळला. प्रत्यक्षात विमानाजवळ प्रवाशांचे सामान घेऊन जाणारी ट्रॉली (trolley) ओढत असलेल्या ट्रॅक्टरला आग (Fire) लागली.

Mumbai airport
मुंबई विमानतळ   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • एअर इंडियाच्या विमानाच्या अगदी जवळ होता ट्रॉली ओढणारा ट्रॅक्टर
  • विमानात प्रवासी होते, अग्निशमन दलाने तातडीने आग आटोक्यात आणली
  • एअर इंडियाचे विमान मुंबईहून जानगरला जात होते, विमानात ८५ जण होते

मुंबई : मुंबई विमानतळावर (Mumbai airport) सोमवारी होणारा मोठा अपघात (Accident) टळला. प्रत्यक्षात विमानाजवळ प्रवाशांचे सामान घेऊन जाणारी ट्रॉली (trolley) ओढत असलेल्या ट्रॅक्टरला आग (Fire) लागली. ही ट्रॉली विमानाच्या अगदी जवळ होती. सुदैवाने आग विमानापर्यंत पोहोचली नाही. जर आग विमानापर्यंत पोहोचली असती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. परंतु अग्निशमन दलाच्या (Fire brigade) गाड्या घटनास्थळी लगेच पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली. ट्रॅक्टरला ही आग कशी लागली याचा तपास सध्या सुरू आहे. अपघातात कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघातात कोणीही जखमी झाले नाही

एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ट्रॉली ओढणाऱ्या ट्रॅक्टरला आग कशी लागली, याचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या ठिकाणी असलेल्या विमानात प्रवासी होते. एअर इंडियाच्या AIC-647 विमानाजवळ हा अपघात झाला असून हे विमान मुंबईहून जामनगरला जाणार होते. एअर इंडियाच्या या विमानात 85 प्रवाशी   होते.  

ट्रॅक्टरला आग लागल्याची माहिती मिळताच विमानतळावर उपस्थित असलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी