बाप आणि मुलीचे नाते पवित्र समजले जाते, परंतु आंध्र प्रदेशमधील एका घटनेमुळे बाप आणि मुलीच्या नात्याला कलंक लागला आहे. एका ४२ वर्षीय बापाने आपल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला आहे. मुलगी सारखी फोनवर असते या रागातून आपण असे केल्याचे नराधम आरोपीने म्हटले आहे.
अधिक वाचा : महाराष्ट्र हादरला ! घरात पूजा करत असताना सुनेकडून सासूची गोळ्या झाडून हत्या , पिस्तुलही आणली होती चोरून
विशाखापट्टनमध्ये एक १५ वर्षांची मुलगी आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. दोन वर्षांपूर्वी मुलीच्या वडिलांची तब्येत बिघडली होती. त्यांची किडनी निकामी झाल्याने त्यांना दुसरी किडनी प्रत्यारोपण करणे गरजेचे होते. तेव्हा मुलीच्या आईने त्यांना एक किडनी दान केली. पाच महिन्यांपूर्वी मुलीच्या आईची तब्येत बिघडली. तेव्हापासून मुलगी आपल्या आई वडिलांची काळजी घेत होती आणि शाळेत जात होती.
अधिक वाचा : किरीट सोमय्या ही भाजपची आयटम गर्ल, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
परंतु मुलगी सतत फोन वापरत असते म्हणून तिच्या वडिलांना राग आला. म्हणून त्यांनी मुलीवर बलात्कार केला. वडिलांच्या अत्याचाराला कंटाळून अखेर पीडित मुलीने आपल्या शिक्षिकेकडे झाली घटना सांगितली. शिक्षिकेने वडिलांना शाळेत बोलवले आणि त्यांना जाब विचारला. तेव्हा आपली चूक झाली म्हणून आरोपी बापाने माफी मागितली. त्यानंतर शिक्षिकेने मुलीसोबत पोलीस स्थानक गाठले आणि रीतसर तक्रार दाखल केली.
अधिक वाचा : प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा Wishes, Images, WhatsApp Stickers
नंतर पोलिसांनी पीडित मुलीला रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले, तिथे मुलीवर अत्याचार झाल्याचे निष्पण्ण झाले. पोलिसांनी नराधम बापाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.