Colloidal silver : अरे बापरे! एका सिल्व्हर सप्लीमेंटमुळे हा माणूस झाला पूर्ण निळा

Instagram Post : माणसाची त्वचा निळी (Blue Skin) असू शकते? असे खरेच होऊ शकते का. सध्या इंस्टाग्रामवरील (Instagram) एका पोस्टमुळे हा विषय चर्चेत आला आहे. एका माणसाच्या निळ्या रंगाबद्दल आणि त्यामागच्या कारणाबद्दल चर्चा होते आहे. कोलोइडल सिल्व्हर सप्लिमेंट्सचा वापर ताप आणि त्वचा रोगावर केला जातो. ऍसिड रिफ्लक्स आणि संधिवातासारख्या आजारांसाठी कोलाइडल सिल्व्हर घेतल्यानंतर त्याचा रंग निळा झाल्याची उदाहरणे.

Colloidal silver
कोलाइडल सिल्व्हर 
थोडं पण कामाचं
  • इंस्टाग्रामवरील (Instagram) एका पोस्टमुळे त्वचेच्या रंगाचा विषय चर्चेत
  • कोलाइडल सिल्व्हर (Colloidal silver) त्वचा निळी होण्याचा मुद्दा
  • सप्लीमेंट घेतल्यामुळे किंवा काही आजारात त्वचा होते निळी

Colloidal silver :नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी हॉलिवूडमध्ये एक नव्या संकल्पनेवर आधारित सुपरहिट चित्रपट आला होता. या चित्रपटाचे नाव होते अवतार (Avatar) असे होते. या चित्रपटातील एक पात्रांचे दिसणे हे अगदी वेगळेच होते. यात लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे या पात्रांचे असलेले निळे चेहरे. त्वचेचा रंग निळा असणे ही काही सामान्य बाब नाही. त्यामुळे ही पात्रे सगळ्यांच्याच लक्षात राहिली आहेत. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की माणसाची त्वचा निळी (Blue Skin) असू शकते? असे खरेच होऊ शकते का. सध्या इंस्टाग्रामवरील (Instagram) एका पोस्टमुळे हा विषय चर्चेत आला आहे. एका माणसाच्या निळ्या रंगाबद्दल आणि त्यामागच्या कारणाबद्दल चर्चा होते आहे. मुळात एखाद्या माणसाचा रंग निळा कसा काय असू शकतो किंवा निळा कशामुळे होऊ शकतो याविषयी चर्चा होते आहे. (A man become blue due to silver supplement)

अधिक वाचा : Earthquake:देशात भूकंपाचे धक्के, दिल्ली-यूपीसह 7 राज्यांमध्ये हादरे; नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू

इंस्टाग्राम पोस्ट

त्वचेचा रंग निळा कसा काय असेल. तुम्हीदेखील नाही म्हणाल. मात्र हे हेऊ शकते. कोलाइडल सिल्व्हर तुमच्या त्वचेचा रंग निळा करू शकतो. यासंदर्भातच अलीकडेच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये म्हटले होते की कोलाइडल सिल्व्हर (Colloidal silver) तुमची त्वचा निळी करू शकत नाही. परंतु इंस्टाग्रामने त्यावर चुकीची माहिती दिली आहे. म्हणून संशोधक किंवा सत्यशोधकांना यावर अभ्यास करून मत मांडण्यास सांगण्यात आले होते. 

अधिक वाचा :  Nirav Modi Extradition: नीरव मोदी लवकरच भारतात येणार; लंडन उच्च न्यायालयाने फेटाळला अर्ज

कोलाइडल सिल्व्हर

आता कोलाइडल सिल्व्हर म्हणजे काय असते ते जाणून घ्या. कोलोइडल सिल्व्हर सप्लिमेंट्सचा वापर ताप आणि त्वचा रोगावर केला जातो. तसेच याचा इतर अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. पेनिसिलिनचा शोध लागण्यापूर्वी, संक्रमण टाळण्यासाठी जखमांवर सिल्व्हर नायट्रेटचा वापर केला जात असे. मात्र पेनिसिलिनचा शोध लागल्यानंतर त्याची आवश्यकता राहिली नाही आणि याचा  वापर बंद झाला. कारण आता पेनिसिलीनसारखे प्रभावी औषध हाती आले होते. 

मात्र आजही काही लोक कोलाइडल सिल्व्हरचा सप्लीमेंट म्हणून वापर करतात. त्यानंतर इंस्टाग्रामच्या या पोस्टप्रमाणेच दावा केला जातो की कोलाइडल सिल्व्हरमुळे  तुमची त्वचा निळी होणार नाही. या पोस्टमध्ये लिहिले आहे की 'कोलॉइडल सिल्व्हर तुमची त्वचा निळी करू शकत नाही'. यात पॉल कार्सनचा फोटो देखील शेअर करण्यात आला आहे. ऍसिड रिफ्लक्स आणि संधिवातासारख्या आजारांसाठी कोलाइडल सिल्व्हर घेतल्यानंतर त्याचा रंग निळा झाला होता.

मात्र वस्तुस्थिती तपासल्यानंतर या दाव्यात काहीही तथ्य नसल्याचे आढळून आले. कार्सन, ज्याला 'पापा स्मर्फ' या नावाने ओळखले जाते, त्याच्या त्वचेचा रंग निळा होता. या प्रकाराला अर्गिरिया किंवा सिल्व्हर पॉयझनिंग म्हणतात. यामुळे त्वचेचा रंग निळा होतो.

अधिक वाचा :  Crime : प्रेमात आला संशय...दिली 65 तोळे सोन्याची सुपारी... पत्नीनेच घडवून आणली हत्या, पाहा सिनेमास्टाइल गुन्हा

जर्नल डर्माटोलॉजीमध्ये आलेल्या या विषयावरील एका लेखात असे म्हटले आहे की सामान्य आर्गीरियामध्ये त्वचेचा रंग राखाडी ते निळा होतो. रंगातील हा बदल चांदीच्या कणांच्या त्वचेतील साठ्यामुळे होते. हे कोलाइडल सिल्व्हर किंवा चांदीचे क्षार असलेल्या द्रावणांच्या दीर्घकाळ सेवनानंतर तयार होतात. या लेखात असेही म्हटले आहे की सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात असलेल्या भागात त्वचेचा रंग अधिक बदलतो. अनेकदा हा बदल कायमचा होतो. आर्गिरियामध्ये बदलणाऱ्या त्वचेच्या रंगावर कोणताही इलाज नाही.

सप्लीमेंटमुळे लोक निळे झाल्याची एकही घटना नाही, असे म्हणणेही खरे नाही. कारण वैद्यकीय शास्त्रातही अशी काही प्रकरणे नोंदली गेली आहेत. यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजे एफडीने (FDA) या पदार्थावर बंदी घातली नसली तरी, त्यांनी यासंदर्भात चेतावणी दिली आहे. त्यात एफडीएने असे म्हटले आहे की कोलोइडल सिल्व्हर घटक किंवा चांदीचे क्षार असलेली फार्मास्युटिकल उत्पादने, औषधे सुरक्षित नसतात. या औषधांच्या वापराला योग्य ठरवण्यात आलेले नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी