Free Laptop Scheme for Students:सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत असलेल्या एका मेसेजची जोरदार चर्चा होत आहे. देशातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिले जात असल्याचा दावा या मेसेजमध्ये केला जात आहे. मात्र, यासाठी काही अटी व शर्ती देखील लागू करण्यात आल्या आहेत. (a message with a link is claiming to offer free laptops for youth and asking for personal details is fake)
अधिक वाचा : सावधान! लघवी बराच वेळ रोखल्याने उद्भवू शकतात या गंभीर समस्या
व्हायरल मेसेजनुसार, 10 ते 50 वयोगटातील लोक मोफत लॅपटॉपसाठी नोंदणी करू शकतात, परंतु ते विद्यार्थी असणे आवश्यक आहे. या मेसेजमध्ये नोंदणी करण्यासाठी एक लिंक देखील देण्यात आली आहे. ज्यावर तुम्हाला तुमचे नाव, शैक्षणिक स्तर आणि वय ई. तपशील भरावी लागेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या आवडत्या ब्रँडचा लॅपटॉप दिला जाईल.
मोफत लॅपटॉप योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्याचा दावा केला जात आहे, त्या योजनेवर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचा उल्लेख नाही. त्यामुळे या योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पीआयबी फॅक्ट चेकने याची दखल घेत, या व्हायरल मेसेजची आणि त्यात नमूद केलेल्या योजनेची सखोल चौकशी केली.
अधिक वाचा : B.Tech पास मुलीने रस्त्याच्या कडेला लावला हटके मोमो स्टॉल
पीआयबी फॅक्ट चेकच्या तपासात जे काही समोर आले आहे, ते खरोखरच आश्चर्यकारक आहे. विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्याचा दावा करणारा हा व्हायरल मेसेज पूर्णपणे खोटा आहे. यासोबतच मेसेजमध्ये दिलेली लिंकही पूर्णपणे खोटी आहे. ही सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचे कामअसू शकते, जी नोंदणी फॉर्मच्या बहाण्याने तुमची वैयक्तिक माहिती घेऊन तुमची मोठी फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे. PIB Fact Check ने लोकांना त्यांचे वैयक्तिक तपशील कोणाशीही शेअर न करण्याचे आवाहन केले आहे.