Viagra Overdose : नवविवाहित तरुणाने व्हायग्राचा घेतला ओवरडोस, बायको वैतागून गेली माहेरी, करावी लागली शस्त्रक्रिया

उत्तर प्रदेशमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका नवविवाहित तरुणाने व्हायग्राचा ओवर डोस घेतला. त्यामुळे त्याची तब्येत बिघडली. व्हायग्राच्या ओवरडोसमुळे या तरुणाला रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. परंतु आयुष्यभर त्याला एक समस्या जाणवणार आहे 

Viagra
व्हायग्राचा ओवर डोस   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उत्तर प्रदेशमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे.
  • एका नवविवाहित तरुणाने व्हायग्राचा ओवर डोस घेतला. त्यामुळे त्याची तब्येत बिघडली.
  • व्हायग्राच्या ओवरडोसमुळे या तरुणाला रुग्णालयात दाखल करावे लागले.

Viagra Overdose : लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका नवविवाहित तरुणाने व्हायग्राचा ओवर डोस घेतला. त्यामुळे त्याची तब्येत बिघडली. व्हायग्राच्या ओवरडोसमुळे या तरुणाला रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. परंतु आयुष्यभर त्याला एक समस्या जाणवणार आहे 

उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणाचे नुकतंच लग्न झाले होते. परंतु या तरुणाला त्यच्या इरेक्टाईल डिसफंक्शनचा त्रास होता. या तरुणाच्या मित्रांनी त्याला व्हायग्रा सेवन करण्याचा सल्ला दिला. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याविना या तरुणाने व्हायग्राचे सेवन करण्यास सुरूवात केली. परंतु प्रत्येक औषधाची एक मात्रा असते. हे तरुणाच्या लक्षातच आले नाही. या तरुणाने व्हायग्राचा चारपट मात्रा सेवन केली. त्यामुळे त्याच्या गुप्तांगात जास्त ताठरपणा आला. नवर्‍याच्या या वागण्यामुळे अखेर बायकोने त्याला सोडून दिले आणि माहेरी परतली. त्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांनी समेट घडवून आणला. त्यानंतर तरुणाची पुन्हा तब्येत बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
अखेर डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली आणि त्याला आराम मिळाला. असे असले तरी त्याची बायको त्याला सोडून गेली होती. तसेच शस्त्रक्रिये नंतरही त्याला एक समस्या कायमची असणार आहे. हा तरुण मुलं जन्माला घालण्यास सक्षम आहे. परंतु त्याच्या लिंगाचा ताठरपणा कमी होणार नाही. यासाठी त्याला घट्ट कपडे घालण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.  तरुणाला डॉक्टरांकडे दाखल केल्यानंतर बायकोने पुन्हा माहेर गाठले. तसेच सासरी न परतण्याचा निश्चय केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी