accident in Firozabad: गर्भवती महिलेला ट्रकची धडक, अपघातानंतर महिलेचं पोट फाटून बाळ आलं बाहेर

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) फिरोजाबाद (Firozabad) येथे झालेल्या एका भीषण अपघातात (accident) एक चमत्कारी घटना घडली आहे. परंतु यात गर्भवती महिलेचा (pregnant woman) मृत्यू (death) झाला आहे. बुधवारी हा अपघात घडला असून या घटनेदरम्यान,  देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती आली.

accident in Firozabad
ट्रकच्या धडकेनं गर्भवती महिलेचं फाटलं पोट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ट्रकच्या धडकेत गर्भवती महिलेचा मृत्यू.
  • दुचाकीचा ताबा सुटल्यानंतर गर्भवती महिला ट्रक खाली चिरडली गेली.
  • अपघातात गर्भवती महिलेचं पोट फाटून बाळ बाहेर आले.

फिरोजाबाद: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) फिरोजाबाद (Firozabad) येथे झालेल्या एका भीषण अपघातात (accident) एक चमत्कारी घटना घडली आहे. परंतु यात गर्भवती महिलेचा (pregnant woman) मृत्यू (death) झाला आहे. बुधवारी हा अपघात घडला असून या घटनेदरम्यान,  देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती आली. एका गर्भवती महिलेला ट्रकने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, महिलेचा जागीच मृत्यू झाला,. या अपघातात महिलेचा गर्भ फाटून बाळ बाहेर आले. बाळाला सुखरूप पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

लोक त्याला मिरॅकल बेबी किंवा चमत्कारिक बेबी म्हणून संबोधत आहेत. त्यांना फिरोजाबाद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे प्रकरण फिरोजाबादचे आहे. ही घटना यूपीच्या फिरोजाबाद जिल्ह्यातील नारखी पोलीस स्टेशन परिसरातील बरतारा गावातील आहे. येथे पती-पत्नी दुचाकीवरून जात होते. यादरम्यान दुचाकीस्वाराचा तोल गेला आणि त्याच्या पत्नीला ट्रकच्या खाली सापडले.  

Read Also : Elaichi Benefits For Mens: पुरुषांसाठी वरदान आहे इलायची

ट्रकने धडक दिल्याने गर्भवती महिलेचे पोट फुटले. पोटातील बाळ बाहेर आले. लहान मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून त्या बाळाला फिरोजाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नवजात बालकाची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलगी पूर्णपणे बरी असून तिला उपचाराची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. 

मृत्यू प्रकरण

फिरोजाबाद अपघातातील महिलेचा गर्भ फाटल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेबाबत एसएचओ फतेह बहादूर सिंह यांनी सांगितले की, हा अपघात बरतारा गावाजवळ झाला. हा परिसर नरखी पोलीस ठाण्याच्या परिसरात येतो. या घटनेतील मृत महिलेचे नाव कामिनी असे आहे. ती 26 वर्षांची आहे. ही महिला तिच्या पतीसह दुचाकीने कोटला फरीहा भागातील आई-वडिलांच्या घरी जात होती. त्यादरम्यान हा अपघात झाला. 

Read Also : कोण असतील देशाचे राष्ट्रपती सिन्हा की द्रौपदी मुर्मूं?

विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारची धडक होऊन नये म्हणून मृत महिलेचा पती रामू प्रयत्न करत होता. परंतु त्याचदरम्यान त्याचा दुचाकीवरल ताबा सुटला, असा दावा स्थानिकांनी केला. कामिनी खाली पडली आणि भरधाव ट्रकने तिला चिरडलं. एसएचओ बधोरिया यांनी सांगितले की, ट्रकचा चालक फरार झाला आहे. सीसीटीव्ही तपासले जात आहेत. पतीच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी