JNU Violence: जेएनयुत मांसाहरावरून अभाविप आणि डाव्या विद्यार्थ्यांमध्ये मारहाण, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठा पुन्हा चर्चेत आले आहे. रविवारी विद्यापीठात मांसाहरावरून डाव्या पक्षाचे विद्यार्थी आणि भाजपची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये मारहाण झाली आहे.

jnu violence
जेएनयु हिंसाचार  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठा पुन्हा चर्चेत आले आहे.
  • मांसाहरावरून डाव्या पक्षाचे विद्यार्थी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये मारहाण झाली आहे.
  • विद्यापीठात वाद झाला आणि वादाचे रुपांतर मारहाणीत झाले

JNU Vioelence : नवी दिल्ली : नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठा पुन्हा चर्चेत आले आहे. रविवारी विद्यापीठात मांसाहरावरून डाव्या पक्षाचे विद्यार्थी आणि भाजपची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये मारहाण झाली आहे. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी मांसाहरावरून कावेरी हॉस्टेलमध्ये मारहाण केली आहे. तर दुसरीकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आरोप केला आहे की, डाव्या पक्षाच्या विद्यार्थ्यांनी त्यांना रामनवमीची पूजा करण्यास रोखले. यामुळे विद्यापीठात वाद झाला आणि वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. 


जवाहरलाल नेहरु विद्यापीठात कावेरी हॉस्टेलमध्ये रहाणार्‍या विद्यार्थ्यांनी रामनवमी निमित्त विद्यापीठाच्या आवाराज्त पुजेचे आयोजन केले होते. यावेळी डाव्या पक्षाच्या विद्यार्थ्यांनी पुजेत अडथळा आणला असा आरोप अभाविपने केल आहे. तर दुसरीकडे डाव्या पक्षाच्या विद्यार्थ्यांनी सांगितले की आम्हाला अभाविपच्या विद्यार्थ्यांनी मांसाहर करण्यास रोखले. या मुद्द्यावरून दोघांमध्ये मारहाण झाली, याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. 

डाव्या पक्षांच्या विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे की, अभाविपच्या विद्यार्थ्यांनी द्वेषाचे राजकारण करून कावेरी हॉस्टेलचे वातावरण बिघडवले आहे. अभाविपचे कार्यकर्ते विनाकारण हिंसा करत आहेत. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी रात्री मेसच्या कमिटीकडे जेवणाचा मेन्यू बदलण्यासाठी दबाव आणत होते. तसेच अभाविपच्या गुंडांनी डाव्या पक्षाच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली अशी जेएनयू स्टुडेंट युनियनने केला आहे. 

हॉस्टेलमध्ये वेगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी राहतात आणि जेवण्याच्या यादीत शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे अन्न असते. ज्याला जे खायचे आहे तो ते खातो असे स्टुडंट युनियनने म्हटले आहे. परंतु रात्रीच्या जेवण्यात बदल होऊन फक्त शाकाहार करण्यासाठी दबाव आणत होते असेही स्टुडंट युनियनने सांगितले आहे. 


तर दुसरीकडे अभाविपने डाव्या पक्षांच्या विद्यार्थ्यांवर आरोप केला आहे की हे विद्यार्थी रामनवमीच्या पुजेत अडथळा आणत होते. तीन दिवसांपूर्वीच हॉस्टेलमध्ये पुजा होईल असे सांगण्यात आले होते, तरी डाव्या पक्षाच्या विद्यार्थ्यांनी विघ्न आणले असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी