Bennett Kaspar Williams | धक्कादायक! ३७ वर्षांच्या ट्रान्सजेंडर पुरुषाने दिला मुलाला जन्म, आई म्हटल्यावर चिडला सर्वांवर

Transgender gave birth to boy | अमेरिकेतील एका ट्रान्सजेंडर पुरुषाने (Transgender) एका मुलाला जन्म देऊन सगळ्यांनाचा धक्का दिला आहे. या घटनेनंतर या ट्रान्सजेंडर पुरुषाची (Transgender gave birth to boy) खूपच चर्चा होते आहे. सगळे त्याला आई म्हणून हाक मारत आहेत, मात्र यामुळे या पुरुष फक्त चिडलाच नाही तर दु:खीदेखील झाला. मुलाच्या जन्मानंतर या ट्रान्सजेंडरने म्हटले की मी एक पुरुष (Male) आहे आणि मी एका मुलाला जन्म दिला आहे. मला वाटते की प्रेग्नेंसीसंदर्भात महिलांनाच (Woman) जोडून पाहणे आता बंद केले पाह

Transgender gave birth to boy
ट्रान्सजेंडर पुरुषाने दिला मुलाला जन्म  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • अमेरिकेत एका ट्रान्सजेंडरने पुरुषाने दिला मुलाला जन्म
  • सर्जरी करून शरीरात केले होते बदल
  • मातृत्व आणि स्त्रीत्व वेगवेगळे असल्याचे मांडले विचार

Transgender gave birth to boy | न्यूयार्क : अमेरिकेतील एका ट्रान्सजेंडर पुरुषाने (Transgender) एका मुलाला जन्म देऊन सगळ्यांनाचा धक्का दिला आहे. या घटनेनंतर या ट्रान्सजेंडर पुरुषाची (Transgender gave birth to boy) खूपच चर्चा होते आहे. सगळे त्याला आई म्हणून हाक मारत आहेत, मात्र यामुळे या पुरुष फक्त चिडलाच नाही तर दु:खीदेखील झाला. मुलाच्या जन्मानंतर या ट्रान्सजेंडरने म्हटले की मी एक पुरुष (Male) आहे आणि मी एका मुलाला जन्म दिला आहे. मला वाटते की प्रेग्नेंसीसंदर्भात महिलांनाच (Woman) जोडून पाहणे आता बंद केले पाहिजे. (A transgender man gave birth to a baby boy, says pregnancy is not related woman only)

सर्जरी करून केला होता शरीरात बदल

३७ वर्षांच्या बेनेट कास्पर विलियम्स (Bennett Kaspar Williams)या अमेरिकेतील ट्रान्सजेंडरची ही कथा आहे. तो लॉस एंजेलिस येथे राहतो. तो एक ट्रान्सजेंटर पुरुष आहे. बेनेटने सांगितले की सात वर्षांआधी तो एक महिला होता. मात्र ३ लाखांपेक्षा जास्तची सर्जरी करून त्याने आपली ब्रेस्ट ट्रीटमेंट केली. मात्र महिलांच्या शरीरात अपत्य जन्माला देण्याच्या अवयवात कोणताही बदल केला नाही. बेनेटचे म्हणणे आहे की त्याने हे फक्त यासाठी केले की त्याला मातृत्वाचे सुख घ्यायचे होते.

डेलीमेलमध्ये आलेल्या एका वृत्तानुसार २०१७ मध्ये बेनेटची मलिक नावाच्या एका व्यक्तीशी भेट झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनीही कुटुंब वाढवण्याचा निर्णय घेतला. वृत्तानुसार बेनेटने मागील वर्षी हडसन नावाच्या मुलाला जन्म दिला होता. बेनेटने अलीकडेच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आपल्या तेव्हाच्या विचित्र अनुभवाबद्दल लिहिले आहे. त्याने आपला राग व्यक्त केला आहे.

बेनेटचे मातृत्वाबद्दलचे विचार

बेनेटने म्हटले आहे की जेव्हा त्याने मुलाला जन्म दिला, तेव्हा हॉस्पिटलमध्ये लोक त्याला वडील म्हणण्याऐवजी आई म्हणून हाक मारू लागले. यामुळे त्याला खूपच धक्का बसला होता. बेनेटचे म्हणणे आहे की मातृत्व ही भावना फक्त महिलांमध्ये नाही तर पुरुषांमध्येदेखील असू शकते बेनेट म्हणतो की मातृत्व आणि स्त्रीत्व यात फरक आहे. मात्र लोक हा फरक लक्षात घेत नाहीत. लोकांच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट आहे की फक्त महिलाच जगात अपत्याला जन्म देऊ शकतात आणि त्यांच्यात फक्त मातृत्व असते.

मातृत्व आणि स्त्रीत्व

डेलीमेलशी बोलताना बेनेटने मातृत्वसंदर्भातील आपले विचार व्यक्त केले आहेत. त्याचे म्हणणे आहे की सर्वांना मातृत्व आणि स्त्रीत्व वेगळे आहे हे लक्षात घ्यावे लागेल. आपल्याला हे समजावे लागेल की जो माणूस कोणत्याही अपत्याला जन्म देऊ शकतो त्याच्यामध्ये मातृत्व आहे. मला एवढचे सांगायचे आहे की फक्त महिलाच आई होऊ शकतात किंवा मातृत्व धारण करू शकतात असे नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी