बापरे! महिलेची तब्बल ३१ वेळा झाली कोरोना टेस्ट, सर्व अहवाल पॉझिटिव्ह

Woman tests positive for Coronavirus 31 times: गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात कोरोना बाधित झालेली महिला अद्यापही कोरोनामुक्त झालेली नाहीये. ही महिला राजस्थानमधील भरतपूर येथील निवासी आहे.

corona_update
प्रातिनिधीक फोटो 

थोडं पण कामाचं

  • महिलेची तब्बल ३१वेळा झाली कोरोना चाचणी
  • सर्वप्रथम ऑगस्ट २०२० मध्ये झाली कोरोना चाचणी
  • राजस्थानमधील ही महिला अद्यापही आयसोलेशनमध्ये आहे

जयपूर : कोरोना विषाणूने (Coronavirus) जगभरात थैमान घातले आणि कोट्यावधी नागरिकांना त्याचा संसर्ग झाला. यापैकी अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू सुद्धा झाला तर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी कोरोनावर मातही केली. मात्र, आता अशी एक घटना समोर आली आहे ज्याने सर्वांनाच चक्रावून टाकले आहे. होय, कारण एका ३० वर्षीय महिलेला पाच महिन्यांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि अद्यापही ती कोरोनामुक्त झालेली नाहीये.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजस्थानमधील भरतपूर (Bharatpur) येथील ३० वर्षीय महिलेला ऑगस्ट २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत या महिलेच्या तब्बल ३१ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत आणि या सर्व चाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेच्या आतापर्यंत १७ आरटी-पीसीआर तर १४ वेळा रॅपिड अँटिजन टेस्ट झाल्या आहेत. २८ ऑगस्ट रोजी तिची पहिली कोविड चाचणी करण्यात आली होती. 

महिलेची तब्येत स्थिर

या महिलेला आतापर्यंत अॅलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक औषधे सुद्धा दिली गेली आहेत. ही महिला गेल्या पाच महिन्यांपासून आयसोलेशनमध्येच आहे. एक चांगली गोष्ट असी की, कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असतानाही या महिलेची प्रकृती अतिशय उत्तम आणि स्थिर आहे. इतकेच नाही तर या काळात तिचे वजनही ८ किलोने वाढले आहे.

या महिलेला १ सप्टेंबर रोजी 'अपना घर' नावाच्या केअर होममध्ये दाखल करण्यात आले. अपना घर प्रशासनाने सांगितले की, ही महिला मानसिकदृष्ट्या खचलेली आहे आणि तिला इम्युनोडेफिशिएंसी नावाचा आजार आहे. तिचा पती आहे आणि आई-वडील नाहियेत. या महिलेच्या भाऊ आणि वहिनीने तिला अपना घर मध्ये दाखल केले आहे. अपना घर मध्ये ३००० हून अधिक नागरिक आहेत जे निराधार आहेत.

सवाई मानसिंह रुग्णालयातील मायक्रोबायोलॉजी तज्ञ डॉ. प्रदीप कुमार यांनी संगितले की, "ही महिला कोरोना बाधित असली तरी तिच्यापासून इतरांना कोणताही धोका नाहीये. कारण तिच्या शरीरातील कोविड व्हायरस अॅक्टिव्ह नाहीये. त्यामुळे तिच्यामार्फत इतरांना संसर्ग होणार नाही. मात्र, तरीही खबरदारी म्हणून तिला आयसोपेशनमध्ये ठेवणे आवश्यक आहे."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी