Delhi Crime News । नवी दिल्ली : पूर्व दिल्लीतील शाहदरा पोलीस स्टेशनमध्ये एका २८ वर्षीय तरुणाने केलेल्या चाकू हल्ल्यात पाच पोलीस कर्मचारी आणि एक होमगार्ड जखमी झाला आहे. शाहदरा सायबर पोलीस स्टेशनच्या तिसऱ्या मजल्यावर बुधवारी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. भारत भाटी असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आले आहे. आरोपी चाकू घेऊन आत आला तेव्हा पोलीस ठाण्यात आठ महिलांसह वीस लोक उपस्थित होते. (A young man from Delhi entered the police station with a knife, 6 policemen injured).
अधिक वाचा : शनि २०२५ पर्यंत या लोकांची वाढवणार डोकेदुखी, वाचा सविस्तर
दरम्यान, या धक्कादायक घटनेबद्दल माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, एक तरूण व्यक्ती पोलीस ठाण्यात घुसली आणि व्हिडीओ बनवायला लागली. पोलिसांनी व्हिडीओबाबत विचारपूस सुरू केली असता, त्या व्यक्तीने रागाच्या भरात चाकू काढून समोर उभ्या असलेल्या सहा पोलिसांवर वार केले. शहदरा येथील पोलीस उपायुक्त आर सथियासुंदरम यांनी सांगितले की, आरोपी भरत भाटी रात्री १२.४५ च्या सुमारास पोलीस ठाण्यात आला होता. तो तेथील कर्मचाऱ्यांशी चर्चा करत होता आणि तिसऱ्या मजल्यावर गेला.
तिसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर त्याने व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. त्याच्याकडे चाकू होता. त्याला थांबवल्यानंतर त्याने पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. आमचे कर्मचारी जखमी झाले. जखमीला वाचवण्यासाठी आणि आरोपीला रोखण्यासाठी कोणी आले असता त्याच्यावरही चाकूने हल्ला केला. अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. ते म्हणाले की, जेव्हा आरोपीने पोलिस स्टेशनमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा लगेच गेट बंद करण्यात आले. नंतर दोन-तीन पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्यांनी त्याचा चाकू हिसकावून आणि त्याला अटक केली. सहा जखमींपैकी एकाच्या छातीला दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.