Aadhaar - Voter ID card Link: आधार वोटर आयडी लिंक याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला होता विरोध

भारत सरकारने मतदार ओळखपत्राला आधार लिंक करणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. यावर काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी आक्षेप घेतला आणि या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती ए.एस.बोपन्ना यावर निर्णय देतील.

Supreme Court
आधार वोटर आयडी लिंक   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारत सरकारने मतदार ओळखपत्राला आधार लिंक करणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता.
  • यावर काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी आक्षेप घेतला
  • आणि या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Aadhaar - Voter ID card Link: नवी दिल्ली : भारत सरकारने (Indian Government) मतदार ओळखपत्राला आधार लिंक (Voter id aadhar card link) करणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. यावर काँग्रेस नेते (Congress Leader) रणदीप सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांनी आक्षेप घेतला आणि या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती ए.एस.बोपन्ना यावर निर्णय देतील. (Aadhaar Voter Id Card Link Hearing Today In Supreme Court On Congress Leader Surjewala challenges news in marathi)

अधिक वाचा : India-China Row: भारताच्या हद्दीत 10 किमी आतपर्यंत घुसली चीनची लढाऊ विमाने

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, इलेक्ट्रॉनिक मतदार फोटो ओळखपत्रासोबात आधार लिंक करणे म्हणजे सामान्य नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर गदा येणे आहे. तसेच ही बाब असंविधानिक असल्याचेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे. 

अधिक वाचा : Sex Racket: सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 10 ते 25 हजारात पुरवल्या जायच्या परदेशी तरुणी

सुरजेवाला यांनी याचिकेत म्हटले आहे की मतदार ओळखपत्रासोबत आधार लिंक केल्याने मतदाराची वैयक्तिक आणि खासगी माहिती  एका वैधानिक प्राधिकरणाला उपलब्ध होईल. म्हणजेच मतदारलाअ आता निवडणूक अधिकार्‍याकडे आपली ओळख स्पष्ट करण्यासाठी आधार कार्ड द्यावे लागेल असे सुरजेवाला म्हणाले आहेत. 

अधिक वाचा : National Herald Case : मंगळवारी सोनिया गांधींची ईडी चौकशी, काँग्रेसची पुन्हा सत्याग्रहाची हाक

विरोधी पक्षाकडून विरोध

काँग्रेस खासदारांनी लोकसभा आणि राज्यसभेत या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे. तसेच इतर विरोधी पक्षांनीही या निर्णयाला विरोध केला आहे. या व्यवस्थेत अनेक त्रुटी आहेत आणि मतदर ओळखपत्रासोबत आधार लिंक केल्यास गरीब मतदारांचे नुकसान होईल असा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. तसेच या निर्णयामुळे मतदारांच्या खासगीपणाच्या हक्कावर गदा येईल असेही विरोधी पक्षाने म्हटले आहे. 

अधिक वाचा : Murder : पत्नीच्या बॉयफ्रेंडला दिली भयंकर शिक्षा, खून करून जंगलातच जाळला मृतदेह, असा लागला छडा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी