Aadhaar-Voter ID Link: आज लोकसभेत सादर होणार मतदार कार्ड आधारशी लिंक करण्याचं विधेयक, निवडणूक सुधारणा विधेयकामुळे काय होतील बदल

कायदा मंत्री किरेन रिजिजू (Law Minister Kiren Rijiju) आज लोकसभेत (Loksabha) निवडणूक सुधारणा विधेयक 2021(Electoral Reform Bill 2021) सादर करणार आहेत.

Aadhaar-Voter ID Link
मतदार कार्डला मिळेल 'आधार', लोकसभेत सादर होणार विधेयक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मतदारांना वर्षातून दर तीन महिन्यांनी मतदार यादीत नाव जोडण्याची एक संधी
  • लष्करात काम करणाऱ्या महिलेच्या पतीला बॅलेट पेपरने मतदान करण्याची सुविधा मिळणार
  • मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा ऐच्छिक पर्याय असणार

Electoral Reforms Bill: नवी दिल्ली :  कायदा मंत्री किरेन रिजिजू (Law Minister Kiren Rijiju) आज लोकसभेत (Loksabha) निवडणूक सुधारणा विधेयक 2021(Electoral Reform Bill 2021) सादर करणार आहेत. विधेयकाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी कायदा, 1950 आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 मध्ये बदल करण्यात येणार आहे.  निवडणूक सुधारणांच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) या बदलांना मंजुरी दिली होती. 


सर्वात मोठा बदल मतदार ओळखपत्राबाबत करण्यात येत आहे. आज मांडण्यात येणाऱ्या विधेयकाच्या मसुद्यात मतदार यादीतील नक्कल आणि बोगस मतदान रोखण्यासाठी मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  एवढेच नाही तर मतदार यादी आधारशी लिंक करण्याचा प्रस्ताव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या ते ऐच्छिक केलं जाणार आहे, म्हणजेच ज्याला लिंक करू वाटले तर तर तो करेल. ज्यांना लिंक करु वाटलं नाही तर त्याच्यावर कोणतीच जबरदस्ती नसणार आहे. म्हणजेच लोकांना त्यांचे मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा पर्याय दिला जाईल.

निवडणूक सुधारणा विधेयकामुळे काय बदल होईल

या वर्षी 17 मार्च रोजी लोकसभेत लेखी उत्तर देताना, तत्कालीन कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी माहिती दिली होती की, निवडणूक आयोगाने आधार प्रणालीला मतदार यादीशी जोडण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, जेणेकरून एखादी व्यक्ती अनेक वेळा नोंदणी करू नये.  वेगवेगळ्या ठिकाणाहून नोंदणी करू शकणार नाही. दुसरा बदल निवडणूक कायद्यातील लष्करी मतदारांच्या समानतेबाबत आहे. आता ते लिंग  निरपेक्ष केलं जाणार आहे.  सध्याच्या कायद्यानुसार, लष्करात काम करणाऱ्या व्यक्तीची पत्नी लष्करी मतदार म्हणून नोंदणी करण्यास पात्र आहे, परंतु महिला जर लष्करात असेल तर पती पात्र नाही. सैनिकी मतदारांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात आली असून सध्याच्या कायद्यामुळे महिला सेवेतील पतींना या सुविधेचा लाभ घेता येत नाही आणि मतदान करता येत नाही. 

तिसरा बदल नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याशी संबंधित आहे. सध्याच्या कायद्यानुसार, 1 जानेवारीला किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांनाच मतदार म्हणून नोंदणी करण्याची परवानगी आहे.  उदाहरणार्थ, जर एखादा युवक 2 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षांचा झाला तर त्याला मतदार यादीत नाव जोडण्यासाठी 1 जानेवारी 2023 पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. नवीन कायदा लागू झाल्यानंतर, मतदारांना वर्षातून दर तीन महिन्यांनी मतदार यादीत नाव जोडण्याची एक संधी मिळेल, म्हणजे वर्षातून चारवेळा नाव जोडण्याची संधी मिळणार आहे.  


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी