आम आदमी पार्टीचे ३ प्रमुख नेते भाजपमध्ये दाखल

Aam Aadmi Party Himachal Pradesh leader Anoop Kesari joins BJP : आम आदमी पार्टीचे ३ प्रमुख नेते भाजपमध्ये दाखल झाले. हिमाचल प्रदेश अध्यक्ष अनुप केसरी, संघटनात्मक जबाबदाऱ्या हाताळणारे संगठन महामंत्री सतीश ठाकुर आणि इकबाल सिंह हे ३ नेते भाजपमध्ये दाखल झाले. 

Aam Aadmi Party Himachal Pradesh leader Anoop Kesari joins BJP
आम आदमी पार्टीचे ३ प्रमुख नेते भाजपमध्ये दाखल 
थोडं पण कामाचं
  • आम आदमी पार्टीचे ३ प्रमुख नेते भाजपमध्ये दाखल
  • 'आप'चे हिमाचल प्रदेश अध्यक्ष अनुप केसरी, संगठन महामंत्री सतीश ठाकुर आणि इकबाल सिंह भाजपमध्ये
  • जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात आम आदमी पार्टीचे ३ प्रमुख नेते भाजपमध्ये दाखल

Aam Aadmi Party Himachal Pradesh leader Anoop Kesari joins BJP : नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे ३ प्रमुख नेते भाजपमध्ये दाखल झाले. हिमाचल प्रदेश अध्यक्ष अनुप केसरी, संघटनात्मक जबाबदाऱ्या हाताळणारे संगठन महामंत्री सतीश ठाकुर आणि इकबाल सिंह हे ३ नेते भाजपमध्ये दाखल झाले. 

दिल्लीत भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी एक विशेष कार्यक्रम झाला. याप्रसंगी नड्डा आणि केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री तसेच हिमाचल प्रदेशचे भाजप अध्यक्ष अनुराग ठाकुर उपस्थित होते. नड्डा आणि अनुराग ठाकुर यांच्या उपस्थितीत अनुप केसरी, सतीश ठाकुर आणि इकबाल सिंह हे ३ नेते भाजपमध्ये दाखल झाले.

भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा सन्मान होतो म्हणून 'आप'चे नेते भाजपमध्ये दाखल होत असल्याचे अनुराग ठाकुर म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये आम आदमी पार्टीच्या सर्व उमेदवारांचे डीपॉझिट जप्त झाले. याच पद्धतीने हिमाचल प्रदेशमध्येही आम आदमी पार्टीचा दारूण पराभव होईल; असे अनुराग ठाकुर यांनी सांगितले. हिमाचल प्रदेशमध्ये लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे. 

आम आदमी पार्टीत अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान या दोन नेत्यांनाच महत्त्व आहे. हिमाचल प्रदेशमधील 'आप'चे सर्व नेते आणि पदाधिकारी यांच्याकडे पक्षाने दुर्लक्ष केले आहे. केजरीवाल यांची भेट मिळणे तर दूरच हिमाचलचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे वेळच नाही. यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे अनुप केसरी, सतीश ठाकुर आणि इकबाल सिंह यांनी सांगितले. 'आप'मध्ये काम करणाऱ्यांना महत्त्व नाही याउलट भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा सन्मान होतो; असेही अनुप केसरी, सतीश ठाकुर आणि इकबाल सिंह यांनी सांगितले. लवकरच हिमाचल प्रदेश 'आप'मध्ये मोठी फूट पडल्याचे दिसेल; असे अनुप केसरी म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी