Corporator killed in Gym: नगरसेवकाची जिममध्ये गोळ्या झाडून हत्या, CCTV VIDEO आला समोर

Corporator shot dead in Gym: नगरसेवकाची भरदिवसा हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जिममध्ये नगरसेवकावर गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबारात मृत्यू झाला आहे. 

AAP municipal councilor Akbar Bholi shot dead in gym in punjab watch cctv
नगरसेवकाची जिममध्ये गोळ्या झाडून हत्या, CCTV VIDEO आला समोर 
थोडं पण कामाचं
  • नगरसेवकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या
  • जिममध्ये अज्ञात इसमाने झाडल्या गोळ्या
  • गोळी झाडल्यावर आरोपींनी काढला पळ

AAP Corporator shot dead in Gym: रविवारी एका नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मृतक नगरसेवकाचे नाव अकबर असल्याची माहिती समोर आली आहे. नगरसेवक अकबर हे रविवारी सकाळच्या सुमारास जिममध्ये गेले असता तेथेच अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात नगरसेवक अकबर यांचा मृत्यू झाला आहे. (AAP municipal councilor Akbar shot dead in gym in punjab watch cctv)

ही घटना पंजाबमधील मलेरकोटला जिल्ह्यात घडली आहे. अकबर  हे आम आदमी पक्षाचे नगरसेवक होते. रविवारी सकाळच्या सुमारास अकबर हे जिममध्ये गेले होते त्याचवेळी अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. अकबर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पोलिसांनी त्याला मृत घोषित केलं. हत्येमागचं नेमकं कारण काय आहे? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरसेवक अकबर हे वॉर्ड नंबर १८ चे नगरसेवक होते. अकबर हे रविवारी सकाळच्या सुमारास जिममध्ये गेले आणि त्यावेळी एक व्यक्ती जिममध्ये शिरला. त्यानंतर त्याने नगरसेवक अकबर यांच्यावर गोळीबार केला. गोळीबार केल्यावर हल्लेखोराने तेथून पळ काढला.

अधिक वाचा : Sidhu Moose Wala murder case: सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर शूटर्सने बनवलेला VIDEO आला समोर

सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी जिममधील आणि जिमच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. आरोपींचा लवकरच शोध घेण्यात येईल असा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

अधिक वाचा : सलमान खानच्या हत्येचा प्लान कसा फसला? गँगस्टर लॉरेन्सने स्वतः केला खुलासा

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध गायक मुसेवालाची हत्या

पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हत्येपूर्वी काही दिवसांपूर्वी पंजाब सरकारने ४२५ जणांना दिलेले संरक्षण काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. ही सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्यावर पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यात आली.

सिद्धू मुसेवाला याच्यावर मानसातील जवाहर गावात गोळीबार झाला होता. ज्यावेळी हा गोळीबार झाला त्यावेळी सिद्धू मुसेवाला हा स्वत: गाडी चालवत होता. कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी सिद्धू मुसेवाला याच्यावर गोळीबार केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी