Maharashtra Politics: नवी दिल्ली: महाराष्ट्रात (Maharashtra) जो अभूतपूर्व सत्तासंघर्ष सुरु आहे त्याच प्रकरणी अखेर आज (२० जुलै) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी झाली आहे. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल, अभिषेक मनूसिंघवी, हरिश साळवे, महेश जेठमलानी आणि अॅडिनशल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्यासारख्या दिग्गज सुप्रीम कोर्टात बाजू मांडत आहेत. यावेळी सुरुवातीला कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी शिवसेनेच्या वतीने बाजू मांडली. ज्यामध्ये त्यांनी शिंदे-फडणवीस हे सरकारच बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. (abhishek manu singhvi strongly arguing in supreme court for shiv sena side shinde govt maharashtra politics)
अधिक वाचा: रामदास कदम का रडले एवढे ढसाढसा?