काँग्रेस आमदाराच्या गेस्ट हाऊसवर ACB ची धाड, पाच ठिकाणी झाडाझडती

ACB raids on Congress MLA properties: काँग्रेसच्या आमदाराच्या गेस्ट हाऊसवर एसीबीने छापेमारी केली आहे. एकूण पाच ठिकाणी एसीबीकडून झाडाझडती सुरू आहे. 

ACB raids on Congress MLA bz zameer ahmed khan guest house in bengaluru raids conducted at 5 different locations
काँग्रेस आमदाराच्या गेस्ट हाऊसवर ACBची धाड, पाच ठिकाणी झाडाझडती  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • काँग्रेसच्या आमदाराच्या मालमत्तांवर एसीबीची धाड 
  • विविध ठिकाणच्या एकूण पाच मालमत्तांवर एसीबीचे छापे 

बंगळुरू : कर्नाटकमधील एसीबी (Anti Corruption Bureau) ने एक मोठी कारवाई केली आहे. ईडीने दिलेल्या अहवालानंतर कर्नाटकातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काँग्रेस आमदाराच्या संबंधित मालमत्तांवर धाड टाकली आहे. कर्नाटकातील काँग्रेसचे नेते आणि आमदार बी झेड जमीर अहमद खान (Congress MLA BZ Zameer Ahmed Khan) यांच्या गेस्ट हाऊससह एकूण पाच ठिकाणच्या मालमत्तांवर सकाळपासून एसीबीकडून धाडसत्र सुरू आहे. (ACB raids at Congress MLA BZ Zameer Ahmed Khan's Guest House in Sadashiva Nagar Bengaluru)

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, छावणी रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या बी झेड जमीर अहमद खान यांचे निवासस्थान, सिल्वर ओक अपार्टमेंटमधील एक फ्लॅट, सदाशिवनगर येथील गेस्ट हाऊस, बनशंकरी येथील जी के असोसिएट्सचे कार्यालय आणि शहरामधील कलासिपल्या येथे असलेल्या नॅशनल ट्रॅव्हल्सच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले आहेत.

एसीबीचे अधिकारी आमदार खान यांच्या जवळील कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. या कागदपत्रांत काही बेकायेशीर व्यवहार किंवा आर्थिक गैरव्यवहार आढळतात का याची तपासणी केली जात आहे. सकाळपासून सुरू असलेली एसीबीची कारवाई अद्यापही सुरूच आहे. या कारवाईत पुढे काय होतं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

चार वेळा आमदार

चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले खान यांच्याशी संबंधित एकूण पाच ठिकाणच्या मालमत्तांवर एसीबीकडून धाडसत्र सुरू आहे. आमदार खान हे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वानी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते.

गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात, ईडीने आमदार खान आणि आणखी एका माजी मंत्र्याच्या घरांवर 4000 कोटी रुपयांच्या आयएमए पॉन्झी योजनेशी कथित संबंध असल्याच्या कारणावरुन छापेमारी केली होती. या योजनेद्वारे हजारो लोकांची फसवणूक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये बहुतांश नागरिक हे मुस्लिम आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी