Ram Navami Tragedy : राम नवमीच्या दिवशी भारतातील दोन मंदिरांमध्ये दुर्घटना

Accidents at two mandir in India on Ram Navami, 25 people fall into well during Ram Navami celebration at Indore and Fire at Andhra Venugopala Swamy mandir : राम नवमी निमित्त देशभर उत्सव साजरा होत आहे. याप्रसंगी भारतातील दोन मंदिरांमध्ये दुर्घटना झाल्या.

Accidents at two mandir in India on Ram Navami
राम नवमीच्या दिवशी भारतातील दोन मंदिरांमध्ये दुर्घटना  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • राम नवमीच्या दिवशी भारतातील दोन मंदिरांमध्ये दुर्घटना
  • इंदूरच्या मंदिरातली विहीर खचली
  • आंध्रच्या वेस्ट गोदावरीमधील वेणुगोपाल स्वामी मंदिरात मंडपाला आग

Accidents at two mandir in India on Ram Navami, many people fall into well during Ram Navami celebration at Indore, 11 dead and Fire at Andhra Venugopala Swamy mandir : राम नवमी निमित्त देशभर उत्सव साजरा होत आहे. याप्रसंगी भारतातील दोन मंदिरांमध्ये दुर्घटना झाल्या. मध्य प्रदेशमधील इंदूरच्या श्री बेलेश्वर मंदिरातली (Mandir / Temple) विहीर खचली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला. तर आंध्रच्या वेस्ट गोदावरीमधील वेणुगोपाल स्वामी मंदिरात मंडपाला आग लागली. 

इंदूरच्या पटेल नगरमधील श्री बेलेश्वर मंदिरात अनेकजण दर्शनाला आले होते. प्रचंड गर्दी होती. अचानक श्री बेलेश्वर मंदिरातली विहीर खचली. मंदिर परिसरात उपस्थित असलेले अनेक भाविक खाली कोसळले. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमींना वैद्यकीय मदत देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मध्य प्रदेश सरकारने श्री बेलेश्वर मंदिरातील दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना 5 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांपर्यंतची मदत देण्याची घोषणा केली आहे.

ज्या भागात इंदूरचे श्री बेलेश्वर मंदिर आहे त्या भागातील गल्लीबोळ अतिशय लहान आहेत. यामुळे मदतकार्य वेगाने करण्यात अडचणी येत आहेत. पण या अडचणींतून मार्ग काढत प्रशासन काम करत आहे. घटनास्थळी पोलीस, स्थानिक प्रशासन, वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका अशी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. 

खचलेल्या विहिरीजवळ मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकाम करण्यात आले होते. हे बेकायदा बांधकाम विहीर खचण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. तर प्रशासनाने चौकशी करून आरोपात तथ्य आहे की नाही हे तपासले जाईल असे सांगितले.

राम नवमी : भाग्योदयासाठी श्रीरामाचे दर्शन घ्या आणि अर्पण करा ही वस्तू

कोणी केलेले श्रीरामाचे नामकरण?

स्मार्टफोनचा स्फोट होण्याची कारणे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी