Faridabad Murder Case: आरोपीचा कबुलीजबाब, 'निकीता दुसऱ्याशी लग्न करत होती म्हणून केली हत्या'

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 28, 2020 | 17:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Faridabad Murder Case:बीकॉमच्या शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी निकीताची हत्या त्यावेळेस झाली जेव्हा सोमवारी दुपारी ती पेपर देऊन कॉलेजमधून परतत होती. आरोपी तौफीक कारमध्ये बसून मित्रांसोबत निकिताची वाट पाहत होता. 

murder case
फरिदाबाद हत्या प्रकरणात आरोपीचा कबुलीजबाब, यामुळे केली हत्या 

थोडं पण कामाचं

  • वल्लभगढमध्ये सोमवारी कॉलेजच्या बाहेर दिवसाढवळ्या निकीता तोमरची हत्या करण्यात आली
  • पेपर देऊन कॉलेजच्या बाहेर निघाली होती बीकॉमच्या लास्ट इयरची विद्यार्थिनी निकिता
  • मुलीच्या कुटुंबियांनी आरोपी तौसीफवर लव्ह जिहादचा आरोप केला आहे. 

मुंबई: फरिदाबादच्या वल्लभगढमध्ये(Haryana's Ballabhgarh)२० वर्षीय विद्यार्थिनी नितिका तोमर(nikita tomar) हिच्या दिवसाढवळ्या झालेल्या हत्येने(murder) संपूर्ण देश खवळला आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी हे लव्ह जिहादचे(love jihad) प्रकरण असल्याचे सांगितले. रिपोर्टनुसार आरोपी तौसीफने हत्या केलेचे कबूल केले असून पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्याने हत्येचे कारण सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार तौसीफचे म्हणणे होते की निकिताचे लग्न दुसऱ्या कोणाशीतरी होणार होते आणि ही गोष्ट त्याला आवडली नव्हती पोलिसांनी तौसीफचा दुसरा सहकारी तसेच आरोपी रेहानला अटक केली आहे. या घटनेनंतर हरियाणा पोलिसांवरही सवाल केले जात आहेत. 

सोमवारी दुपारी कॉलेजमधून पेपर देऊन येत असताना बीकॉमची विद्यार्थिनी निकिताची हत्या झाली. आरोपी यावेळेस कारमध्ये मित्रांसोबत बसला होता. तो निकिता बाहेर येण्याची वाट पाहत होता. निकिता तेथे पोहोचताच त्याने जबरदस्ती निकिताला कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र निकिताने यास विरोध केला. यानंतर तौसीफने तिला जवळून गोळी मारली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

पोलिसांनी दोन आरोपींना केली अटक

दिवसाढवळ्या हत्येचे प्रकरण समोर आल्यानंतर हरियाणा पोलीस सक्रिय झाली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी १० टीम बनवल्या आणि पाच तासांच्या प्रयत्नानंतर मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. मंगळवारी या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीलाही अटक केली. 

दोन दिवस पोलिसांच्या रिमांडमध्ये आरोपी

मुख्य आरोपी तौसीफ गुरुग्रामच्या सोहना भागात कबीर नगरमध्ये राहाणारा आहे. निकिता आणि तौसीफ यांची आधीपासून ओळख होती. तर दुसरा आरोपी रेहान मेवात येथे राहणाराआहे. पोलिसांनी चौकशीसाठी दोन्ही आरोपींना दोन दिवसांसाठी पोलीस रिमांडमध्ये ठेवले. फरिदाबादचे पोलीस कमिशनर ओपी सिंह यांच्या माहितीनुसार तौसीफने २०१८मध्ये निकिताचे अपहरण केले होते. याप्रकरणी वल्लभगढ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर निकिता आणि तौसीफ यांच्यात समझौता झाल्यानंतर प्रकरण थंड झाले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपींविरोधात कडक कारवाई केली जाईल. 

कुटुंबियांचा लव्ह जिहादचा आरोप

पिडीत मुलीचे वडील मूलचंद तोमर यांनी तौसीफवर लव्ह जिहादचा आरोप केला आहे. मूलचंद म्हणाले, तौसीफला निकिताशी लग्न करायचे होते यासाठी तो सतत तिच्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र निकिता त्यासाठी तयार नव्हती. एफआयआरमध्ये लव्ह जिहादचा मुद्दा नाही. 

निकिता-तौसीफ यांचे झाले होते संभाषण

आरोपी तौसीफने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की निकिताचे दुसऱ्या कोणाशीतरी लग्न होणार होते म्हणून त्याने हत्या केली. रिपोर्टनुसार आतपर्यतच्या तपासात हे ही स्पष्ट झाले आहे की २४-२५ ऑक्टोबरच्या रात्री तौसीफ आणि निकिता यांचे एकमेकांशी फोनवर बोलणे झाले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांमध्ये हे संभाषण १००० सेकंद(१६ मिनिट)हून जास्त वेळ झाले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी