Crime News Marathi: उत्तरप्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इटावा जिल्ह्यतील कारागृहात एका कैद्याने आपलं गुप्तांग कापलं आहे. ही घटना जिल्हा कारागृहात घडली आहे. या प्रकरणी कारागृह प्रशासनाने माहिती देताना म्हटलं, मंगळवारी सकाळच्या सुमारास एका कैद्याने शौचालयात ब्लेडच्या सहाय्याने आपलं गुप्तांग कापलं. (accused of rape cut his own penis in etawah jail uttar pradesh crime news in marathi)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहात असलेला हा आरोपी बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत होता. या कैद्याचं नाव अनिल (28) असे आहे. हा कैदी जालौन येथील एका गावातील रहिवासी आहे. त्याने शौचालयात ब्लेडच्या सहाय्याने गुप्तांग कापले. गुप्तांग कापल्यावर त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्यावर इतर कैद्यांनी तेथे जाऊन पाहिले.
त्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवलं. जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यावर त्याला सैफई आयुर्विज्ञान विवि येथे रेफर करण्यात आलं. पोलिसांनी सांगितले की, अनिल हा 2019 पासून जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहे. बलात्कार प्रकरणात तो कारागृहात शिक्षा भोगत आहे. बलात्कार प्रकरणात त्याला 10 वर्षांची शिक्षा झाली आहे.
हे पण वाचा : Honeytrap Case : सेक्स करण्यापूर्वी आधार पॅन बघण्याची गरज नाही, कोर्टाकडून आरोपीला जामीन मंजूर
पोलिसांनी सांगितले की, अनिल याच्यावर 2017 मध्ये एका महिलेने बलात्काराचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण दोन वर्षे कोर्टात सुरू होतं. 2019 मध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाने अनिल याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर गेल्या चार वर्षांपासून तो कारागृहात शिक्षा भोगत आहे. अनिल याच्यावर उपचार करणाऱ्या जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर राघवेंद्र सिंह यांनी सांगितले की, गुप्तांग कापल्यामुळे अनिलचं मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालं आणि त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, अनिल आता बोलण्याच्या स्थितीत आहे. पुढील उपचारासाठी त्याला सैफई येथे रेफर करण्यात आले आहे. या प्रकरणाची माहिती देताना जिल्हा कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक डॉ. रामधनी सिंह यांनी सांगितले की, शौचालयात तुटलेली कुंडी आढळली आहे. त्याच्याच सहाय्याने त्याने आपले गुप्तांग कापले असावे. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.