जोडप्यांचे नको ते फोटो काढून करायचा ब्लॅकमेल, नंतर महिलांवर करायचा बलात्कार

प्रेमी युगलांचे जंगलातील इंटिमेट फोटो आणि व्हिडिओ शूट करुन महिलांवर बलात्कार करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

man_held_for_filming_woman
जोडप्यांचे नको ते फोटो काढून करायचा ब्लॅकमेल, नंतर महिलांवर करायचा बलात्कार  |  फोटो सौजन्य: Representative Image

कानपूर: स्वत:ला कधी पोलीस किंवा कधी मीडियातील व्यक्ती असल्याचे सांगत अनेकांना लुटणाऱ्या एका ग्राहक सेवा केंद्राच्या मालकाला गंभीर गुन्ह्याप्रकरणी अटक (arrest) करण्यात आली आहे. कानपूरच्या (Kanpur) रसूलबाद भागातील असलतगंज जंगलात फिरायला येणाऱ्या प्रेमी जोडप्यांचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करुन त्यांना ब्लॅकमेल (Blackmail) आणि बलात्कार (Rape) करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आता आवळण्यात आल्या आहेत. 

प्रेमी जोडप्यांचे इंटिमेट फोटो शूट करुन आरोपी सुरुवातीला त्यांना ब्लॅकमेल करायचा. त्यांच्या जवळचे पैसे आणि किंमती सामान देखील तो लुटायचा. एवढंच नव्हे तर त्यावेळी महिलांवर बलात्कार करायचा. त्याने आतापर्यंत बर्‍याच महिलांवर बलात्कार केल्याचे आता पोलीस चौकशीत उघड झालं आहे. जंगलात आपल्या बॉयफ्रेंडसोबत फिरण्यासाठी आलेल्या अनेक महिलांवर आरोपी बलात्कार करायचा. तो सुरुवातीला या महिलांचे त्यांच्या बॉयफ्रेंडसोबतचे आक्षेपार्ह फोटो काढून त्या फोटोंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करायचा आणि नंतर त्यांच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. 

पोलिसांनी आरोपीकडून एक मोबाइल जप्त केला असून त्यात अनेक महिलांचे फोटो आणि व्हिडिओ देखील आहेत. प्रमोद उर्फ ​​कल्लू यादव असे आरोपीचे नाव आहे. स्वत: पोलीस असल्याचे सांगून अनेक महिलांवर बलात्कार केल्याची तक्रार कानपूर पोलिसांना मिळाली होती. त्याच आधारे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. 

याप्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आणि त्यांनी आरोपी प्रमोदला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमोद हा ग्राहक सेवा केंद्राचा मालक आहे. त्याला गुरुवारी अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, बॉयफ्रेंडसोबत आलेल्या मुलींचे इंटिमेट फोटो घेत असे. त्याने अनेकदा त्या महिलांवर बलात्कार केले आणि काही वेळा त्यांच्या मौल्यवान वस्तूही लुटल्या. पीडित महिला बऱ्याच अविवाहित असल्याने तो त्यांच्या गैरफायदा घेत असे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी