Achievement of Sheila Dikshit: जाणून घ्या शीला दीक्षित यांचे राजधानी दिल्लीसाठीचे योगदान

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 20, 2019 | 23:03 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Achievement of Sheila Dikshit: शीला दीक्षित यांनी सलग १५ वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. ही पंधरा वर्षे दिल्ली शहरासाठी स्थित्यंतराची होती. याच काळात दिल्लीची प्रगती मोठ्या झपाट्याने झाली.

Sheila Dikshit file photo
शीला दीक्षिताचं दिल्लीसाठी अतुलनीय कर्तृत्व  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • दिल्ली शहराच्या विकासात शीला दीक्षित यांचे योगदान
  • पंधरा वर्षांत राजधानी दिल्लीचा चेहरा बदलला
  • ऐतिहासिक आणि आधुनिक शहर करण्यामागे शीला दीक्षितांचे नेतृत्व

Achievement of Sheila Dikshit: दिल्लीच्या राजकारणात आदराचं स्थान मिळावलेल्या नेत्यांमध्ये शीला दीक्षित यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जाईल. आज, शीला दीक्षित याचं निधन झालं. त्यानंतर त्यांनी राजकीय कारकिर्दीत दिल्लीसाठी दिलेलं योगदान अधोरेखीत केलं जातंय. शीला दीक्षित यांनी सलग १५ वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. दिल्लीचं मुख्यमंत्रिपद इतकं दिर्घकाळ सांभळणाऱ्या त्या एकमेव मुख्यमंत्री आहेत. किंबहुना एखाद्या राज्याची किंवा केंद्रशासित प्रदेशाच सलग १५ वर्षे नेतृत्व करण्याची किमया त्यांनीच साध्य केली आहे. त्यांच्या कारकिर्दीची १५ वर्षे ही दिल्लीसाठी स्थित्यंतराची वर्षे होती. कारण, एकहाती सलग सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी दूरदृष्टी दिल्लीच्या विकासात महत्त्वाची पावले उचलली. त्याला यशही मिळत गेले. त्यामुळं दिल्लीचा चेहरा बदलणाऱ्यांमध्ये शीला दीक्षितांचं नाव पहिल्यांदा घेतलं जाईल. उद्या (रविवार) सकाळी शीला दीक्षित यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास त्यांच्यावर निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

दिल्लीचा चेहरा बदलला

दिल्ली १९९८मध्ये कशी होती आणि आज दिल्लीचा चेहरा काय आहे, ही तुलना केली तरी, शीला दीक्षितांच्या कर्तृत्वाची कल्पना येईल. त्यात शीला दीक्षितांच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीचा मोठा वाटा आहे. शीला दीक्षितांनी सलग तीन वेळा दिल्लीमध्ये काँग्रेसला यश मिळवून दिलं. या काळातच दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत होतं. शहरावर मोठा ताण होता आणि ते हाताळणं कठीण जात होतं. दिल्लीचं आव्हान शीला दीक्षितांच्यासारख्या खंबीर नेतृत्वामुळं पेलता आलं, हे दीक्षित यांचे विरोधकही नाकारणार नाहीत. दिल्लीत मेट्रो सुरू करण्यात शीला दीक्षितांचे मोठे योगदान आहे. त्यासाठीचे काम सुरू करताना, अतिक्रमण, स्थानिक नागरिकांचा दबाव, आंदोलने, पर्यावरणवाद्यांचा विरोध या सगळ्या गोष्टी शीला दीक्षित यांनी अतिशय खुबीनं हाताळल्या. दिल्लीत बीओटी अर्थात बांधा वापरा हस्तांतरीत करा ही संकल्पना राबवण्यात शीला दीक्षित यांचा मोठा वाटा होता.

शीला दीक्षित यांचे कर्तृत्व

  1. दिल्लीमध्ये पहिली मेट्रो शीला दीक्षित यांच्या कार्यकाळातच सुरू झाली
  2. दिल्लीच्या रस्त्यांवरील प्रदूषण कमी करण्यासाठी शहराची ट्रान्सपोर्ट सिस्टम बदलली
  3. दिल्लीत २०१०मध्ये राष्ट्रकूल स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं, ते शीला दीक्षित सरकारचं मोठं काम होतं.
  4. शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात दिल्लीत मोठ मोठे उड्डाणपूल झाले. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुधारली
  5. दिल्लीत धावणाऱ्या बसेसच प्रदूषण मुक्त असाव्यात यासाठी शीला दीक्षित यांनी पुढाकार घेतला या बसेस डिझेल ऐवजी सीएनजी गॅसवर धावू लागल्या
  6. दिल्लीत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून, प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न केला.
  7. दिल्लीत बीआरटी आणि बस कॉरिडॉरचा विकास त्यांच्याच कार्यकाळात झाला.

दीर्घ आजार

शीला दीक्षित गेल्या अनेक वर्षांपासून आजारीच होत्या. त्यांची तीनवेळा बायपास सर्जरी करण्यात आली होती. आज सकाळी केवळ उलटी झाल्यामुळे त्यांना एस्कार्ट्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केल्यानंतरही त्यांचे निधन झाले. शाली दीक्षित यांचे निधन काँग्रेससाठी मोठा झटका आहे. त्यांनी १९९८ ते २०१३ दिल्लीची धुरा समर्थपणे सांभाळली. काँग्रेसच्या करारी नेत्यांमध्ये त्यांचा कायम उल्लेख केला जाईल. २०१३मध्ये आम आदमी पक्ष दिल्लीत उदयाला आला. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली शीला दीक्षित यांच्या बालेकिल्ल्याचा पाडाव झाला. आम आदमी पक्षाने भाजपच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली होती. पण, ती युती टिकली नाही आणि पुन्हा निवडणुका लागल्या. त्यात काँग्रेसला पुन्हा भुईसपाट व्हावे लागले. त्यानंतर खऱ्या अर्थाने शीला दीक्षितांच्या कारकिर्दीला उतरती कळा आली. २०१७मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित केले होते. त्या निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Achievement of Sheila Dikshit: जाणून घ्या शीला दीक्षित यांचे राजधानी दिल्लीसाठीचे योगदान Description: Achievement of Sheila Dikshit: शीला दीक्षित यांनी सलग १५ वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. ही पंधरा वर्षे दिल्ली शहरासाठी स्थित्यंतराची होती. याच काळात दिल्लीची प्रगती मोठ्या झपाट्याने झाली.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता 
राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता 
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
Baramulla Encounter: कलम ३७० लागू झाल्यानंतर पहिल्यांदा दहशतवादी- लष्करात चकमक 
Baramulla Encounter: कलम ३७० लागू झाल्यानंतर पहिल्यांदा दहशतवादी- लष्करात चकमक 
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
काँग्रेस नेते चिदंबरम मुलामुळे गोत्यात? काय आहे, आयएनएक्स मीडिया केस?
काँग्रेस नेते चिदंबरम मुलामुळे गोत्यात? काय आहे, आयएनएक्स मीडिया केस?
INX Media case: चिदंबरम यांच्या घराबाहेर नोटीस, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता 
INX Media case: चिदंबरम यांच्या घराबाहेर नोटीस, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता