Delhi Acid attack: अल्पवयीन मुलीवर भरदिवसा अ‍ॅसिड हल्ला, CCTV आला समोर

Shocking CCTV of acid attack on girl: भरदिवसा एका अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

acid attack on minor girl in delhi incident caught in cctv shocking video goes viral
Shocking! अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • दिल्लीत अल्पवयीन मुलीवर भरदिवसा अ‍ॅसिड हल्ला
  • पीडित मुलीवर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू
  • बाईकवरुन आलेल्या दोन मुलांनी केला अ‍ॅसिड हल्ला, सीसीटीव्हीत घटना कैद

Acid attack on girl in Delhi: दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी एका अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मोहन गार्डन परिसरातील घडली. 17 वर्षीय मुलगी आपल्या लहान बहिणीसोबत जात होती तेव्हा समोरुन आलेल्या बाईकस्वारांनी अ‍ॅसिड हल्ला केला. अ‍ॅसिड हल्ला केल्यावर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. (acid attack on minor girl in delhi incident caught in cctv shocking video goes viral)

या अ‍ॅसिड हल्ल्यात पीडित मुलगी जखमी झाली असून तिला उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती त्यांना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मिळाली होती. पीडित मुलीच्या बहिणीने दोन ओळखीच्या व्यक्तींवर संशय व्यक्त केला आहे. यापैकी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता दिल्ली महिला आयोगाने सुद्धा पोलिसांना नोटीस जारी केली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी ट्वीट करत म्हटलं, पीडित मुलीच्या मदतीसाठी एक टीम रुग्णालयात पाठवण्यात आली आहे. दिल्ली महिला आयोग अनेक वर्षांपासून अ‍ॅसिडवर बंदी आणण्यासाठी लढाई लढत आहे. सरकारला कधी जाग येणार?

दिल्ली पोलिसांनी एका स्टेटमेंटमध्ये म्हटलं की, "मोहन गार्डन परिसरात एका मुलीवर अ‍ॅसिड हल्ला झाला या घटनेची माहिती सकाळी जवळपास 9 वाजण्याच्या सुमारास पीसीआरला कॉल आला होता. या कॉलवर माहिती देण्यात आली होती की, 17 वर्षीय मुलीवर कथितपणे सकाळी 7.30 च्या सुमारास दोन बाईकस्वारांनी अ‍ॅसिडसदृश्य काही पदार्थ फेकून हल्ला केला."

न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांनी सांगितले की घटनेच्या वेळी पीडित मुलगी आपल्या लहान बहिणीसोबत रस्त्यावरुन जात होती. या घटनेप्रकरणी त्यांच्या ओळखीच्या दोन व्यक्तींवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यापैकी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे तर एकाचा तपास सुरू आहे. तर पीडित मुलीला सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी