Rule Break: वाघाचे फोटो काढताना रवीना टंडनने मोडला नियम, वनविभाग करणार चौकशी

देशविदेशातील जंगलांमध्ये फिरणे, तिथल्या प्राण्यांचे फोटो काढणे हा रवीना टंडनचा गेल्या कित्येक वर्षांपासूनचा छंद आहे. नुकतीच ती मध्यप्रदेशातील सातपुडा टायगर रिझर्व्हमध्ये गेली होती. तिथे तिने वाघाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ काढले. मात्र हे करत असताना जंगलाचा नियम तिने मोडला.

Rule Break
वाघाचे फोटो काढताना रवीना टंडनने मोडला नियम  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • फोटोग्राफी करताना रवीना टंडनने मोडले जंगलाचे नियम
  • वाघाच्या अति-जवळ जाऊन काढले फोटो
  • वनविभागाकडून होणार रवीना टंडनची चौकशी

Rule Break by Ravina: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Ravina Tondon) ही एक उत्तम वाईल्डलाईफ फोटोग्राफरदेखील (Wildlife photographer) आहे. वर्षातील बराचसा काळ ती जंगल सफारी करण्यात घालवते. कधी एकटी तर कधी कुटुंब आणि मित्रांसोबत ती जंगल सफारी करताना दिसते. देशविदेशातील जंगलांमध्ये फिरणे, तिथल्या प्राण्यांचे फोटो काढणे हा तिचा गेल्या कित्येक वर्षांपासूनचा छंद आहे. नुकतीच ती मध्यप्रदेशातील सातपुडा टायगर रिझर्व्हमध्ये गेली होती. तिथे तिने वाघाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ काढले. मात्र हे करत असताना जंगलाचा नियम तिने मोडला. वाघापासून कमीत कमी किती अंतर दूूर उभं राहायला हवं, याबाबत वनविभागाचे काही नियम आहेत. या नियमांचा रवीनाने भंग केल्याच आरोप केला जात आहे. 

रवीनाने मोडला नियम

कुठल्याही जंगलात गेल्यावर फोटोग्राफी कऱण्यासाठी किंवा इतर कुठल्याही कारणासाठी प्राण्यापासून किमान 20 मीटर अंतर ठेवणे आवश्यक आहे. त्यापेक्षा प्राण्याच्या अधिक जवळ जाण्याची परवानगी नसते. व्यक्तींची सुरक्षा आणि प्राण्यांची सुरक्षा या दोन्ही बाबी लक्षात घेऊन हा नियम करण्यात आला आहे. मात्र रवीनाकडून हा नियम मोडला गेल्याचं नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओतून दिसून आलं आहे. रवीनाने वाघाचा फोटो काढण्यासाठी कॅमेरा हातात पकडून त्याच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात तिला या नियमाचे भान उरले नाही आणि ती 20 मीटरपेक्षाही वाघाच्या अधिक जवळ गेल्याचं स्पष्ट झालं. 

अधिक वाचा - हॅकर्सनी ‘एम्स’कडे मागितली 200 कोटींची खंडणी: मंत्र्यांसह 4 कोटी रुग्णांचा डेटा लीक झाल्याची भीती

व्हिडिओ होतोय व्हायरल

रवीना टंडनने स्वतःच सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओतून तिने हा नियम पायदळी तुडवल्याचे दिसत आहे. रवीना तिच्या कॅमेऱ्यातून वाघाचे फोटो घेत आहे आणि वाघ तिच्या अगदी जवळून चालत जात असल्याचं या व्हिडिओत स्पष्टपणे दिसतं. वाघ अगदी काही पावलांवरून चालत जात असून रवीना त्याचे फोटो काढण्यात व्यस्त असल्याचं या व्हिडिओतून दिसून आलं आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर वनविभागानं त्याची दखल घेतली आहे. सातपुडा व्याघ्र प्रकल्पाकडून आता रवीनाची चौकशी केली जाणार आहे. 

अधिक वाचा - Shraddha Murder Case: श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताब पूनावालावर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न

या निकषांवर होणार चौकशी

ज्या जिप्सीतून रवीना वाघाच्या परिसरात पोहोचली, त्यावर कुठल्या कुठल्या विभागीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती, जिप्सी वाघाच्या इतक्या जवळ कशी पोहोचली आणि अधिकारी सोबत असतानादेखील नियमांची पायमल्ली कशामुळे झाली यासारख्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या चौकशीतून केला जाणार आहे. हा नियम जाणीवपूर्वक मोडण्यात आला की अपघाताने तो मोडला गेला, रवीना तिच्या जिप्सीसह वाघाजवळ गेली की रवीना खाली उतरून सुरक्षित अंतरावरून फोटोग्राफी करत असताना वाघच चालत तिच्याजवळ आला, यासारख्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच रवीना टंडनचं कौतुक झालं होतं. बिहारच्या जंगलात वाघाला दगड मारणाऱ्या काहीजणांना रवीनाने फैलावर घेत जंगलाचे नियम समजावून सांगितले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी