Addict Wife : नववधूला भांग आणि दारुचं व्यसन, रोजच्या मारहाणीला कंटाळलेल्या नवऱ्याची पोलिसांकडे मदतीची याचना

सुखी संसाराची स्वप्नं पाहून त्याने लग्न केलं आणि नववधूला थाटामाटात घरी आणलं. मात्र तिचं खरं रुप समजल्यावर त्याची वाईट अवस्था झाली.

Addict Wife
नववधूला भांग आणि दारुचं व्यसन  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नववधूचं खरं रुप पाहून नवरा घाबरला
  • दारु पिऊन मारहाण करते आणि घेते चावे
  • तरुणाने केली पोलिसांत तक्रार

Addict Wife : नुकतंच लग्न झालेला (Newly Married) एक तरुण पोलीस स्टेशनमध्ये (Police Station) खेटे घालत असून आपल्या पत्नीपासून (Wife) आपल्या जिवाला धोका (Threat to life) असल्याची तक्रार त्याने पोलिसांत नोंदवली आहे. आपली पत्नी दररोज दारु पिऊन गोंधळ घातले आणि आपल्याला अमानूष मारहात करते, असा आरोप त्याने केला आहे. आपल्या पत्नीपासून आपल्या जिवाला धोका असून आपल्या सुरक्षेसाठी पोलिसांनी काहीतरी करावं, असं साकडंच त्याने पोलिसांना घातलं आहे. 

काय आहे तक्रार?

ही घटना आहे उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यातील. इथल्या एका तरुणाचं काही आठवड्यांपूर्वीच लग्न झालं होतं. थाटामाटात नवी नवरी घरी आल्यामुळे सुखी संसाराचं स्वप्न उराळी बाळगणारा हा तरुण सत्य परिस्थिती पाहून हादरून गेला आहे. लग्न झाल्याच्या काही दिवसांतच बायकोने खरे रंग दाखवायला सुरुवात केले आणि आपल्याला मारहाण सुरू झाली, असं तो सांगतो. त्याच्या पत्नीला दारुचं व्यसन आहे. त्यासोबत ती भांगदेखील पिते. नशेच्या अवस्थेत ती पतीच्या छातीला आणि हातांना चावे घेते. त्याच्या जखमांनी आपण कळवळून उठत असल्याचं तो सांगतो. 

अधिक वाचा - Cow Lovers : अनोखं गायप्रेम! गायीच्या मृत्यूनंतर 1100 ब्राह्मणांना भोजन,चार दिवस पाळलं सूतक

झोपेत केला हल्ला

काही दिवसांपूर्वी आपण गाढ झोपेत असताना पत्नीनं दारुच्या नशेत आपल्याला उठवलं आणि मारहाण करायला सुरुवात केली. आपल्या हातातील बांगड्या आपल्या शरीरावर आपटून आपटून तिने फोडून टाकल्या. त्यानंतर स्वतःचं डोकंही भिंतीवर आपटून घेतलं. यात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाच्या वडिलांना तिने जीवे मारण्याची धमकी दिली. जर तुझ्या आईवडिलांचा हस्तक्षेप असाच सुरु राहिला, तर तुलाही जीवे मारून टाकेन, अशी धमकी तिने स्वतःच्या पतीलाही दिली. रोजच्या प्रकारांना तिचा पती कंटाळला असून आपल्याला पत्नीच्या जातातून मुक्तता हवी असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं आहे. 

अधिक वाचा - Death in Delhi : संसद निवासाच्या छतावरून पडून तरुणीचा मृत्यू, CCTV फुटेजमधून निर्माण झाले अनेक प्रश्न

पोलीस तपास सुरू 

काही दिवसांपूर्वी दारुच्या नशेत धुंद होऊन पत्नी घरात गोंधळ घालत असतानाच पोलिसांना फोन करून बोलावून घेण्यात आलं होतं. पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती काय आहे, हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं. अशा परिस्थितीत तरुणाला कशी मदत करता येईल, याचा विचार पोलीस करत आहेत. पोलिसांच्या देखतच या तरुणीने आपलं आक्रमक रूप दाखवलं. दारुच्या नशेत शिविगाळ करत आपल्या पतीच्या अंगावर धावून जाणे, त्याचे चावे घेण्याचा प्रयत्न करणे, सासऱ्यांना अर्व्याच्य भाषेत शिविगाळ करणे असले प्रकार पाहिल्यानंतर पोलिसांनी तरुणाला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कायदेशीर सल्ला घेऊन तरुणाला यातून कसं बाहेर काढता येईल, याचा विचार सध्या सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी