Afghanistan हादरलं!, मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी स्फोट, इमामासह २० जण ठार

Afghanistan Blast : हेरातच्या गव्हर्नरच्या प्रवक्त्याने सांगितले की हा स्फोट आत्मघातकी हल्ल्यामुळे झाला. मशिदीमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Afghanistan Blast: Blast in Gujargah mosque of Afghanistan during Friday prayers, २० people including Imam killed
Afghanistan हादरल!, मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी स्फोट, इमामासह २० जण ठार  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • अफगाणिस्तानच्या गुजरगाह मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी स्फोट
  • मौलवीसह 20 लोक ठार, 200 जखमी
  • या हल्ल्यामागे इसिसचा खोरासान ग्रुप (ISKP) असल्याचा संशय

blast in herat: अफगाणिस्तानच्या हेरात येथील गुजरगाह मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी स्फोट झाला. टोलो न्यूजनुसार, मशिदीचे इमाम मुजीब इमाम रहमान अन्सारी यांचा या स्फोटात मृत्यू झाला आहे. या स्फोटात इमामसह २० जणांचा मृत्यू झाला आहे. (Afghanistan Blast: Blast in Gujargah mosque of Afghanistan during Friday prayers, २० people including Imam killed)

अधिक वाचा : INS Vikrant : पहिली भारतीय बनावटीची विमानवाहक नौका INS विक्रांत नौदलाच्या सेवेत

हेरातच्या गव्हर्नरच्या प्रवक्त्याने सांगितले की, हा स्फोट आत्मघातकी हल्ल्यामुळे झाला. मशिदीमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. हेरात पोलिसांचे प्रवक्ते महमूद रसोली यांनी सांगितले की, मुजीब रहमान अन्सारी, त्याचे काही रक्षक आणि नागरिक मशिदीकडे जाताना मारले गेले.

मशिदीचा इमाम तालिबानचा समर्थक असल्याचे सांगितले जाते. मुजीब रहमान अन्सारी यांनी जूनच्या उत्तरार्धात या गटाने आयोजित केलेल्या हजारो विद्वान आणि वृध्दांच्या मोठ्या मेळाव्यात तालिबानच्या बचावासाठी जोरदार भाषण केले.

तालिबानचे म्हणणे आहे की त्यांनी सुमारे एक वर्षापूर्वी सत्ता हाती घेतल्यापासून देशातील सुरक्षा सुधारली आहे, परंतु अलीकडच्या काही महिन्यांत मशिदींना लक्ष्य करणारे अनेक स्फोट झाले आहेत. अफगाणिस्तानमधील वाढत्या हल्ल्यांबाबत संयुक्त राष्ट्राने चिंता व्यक्त केली आहे. याआधीही अफगाणिस्तानमध्ये असे अनेक स्फोट झाले आहेत. यावेळी झालेल्या स्फोटाची तीव्रता अतिशय वेगवान सांगितली जात आहे. हेरातच्या मशिदीत झालेल्या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी