Afghanistan : काबूल मशिदीत बॉम्बस्फोट, 20 पेक्षा अधिक ठार; 40 जखमी

Afghanistan : काबूल मशिदीत बॉम्बस्फोट, 20 पेक्षा अधिक ठार; 40 जखमी

Breaking News
Afghanistan : काबूल मशिदीत बॉम्बस्फोट, 20 पेक्षा अधिक ठार; 40 जखमी 

Afghanistan bomb blast : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील मशिदीमध्ये मगरीबच्या नमाजाच्या वेळी स्फोट झाला आहे. या घटनेत 20 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर 40 जण जखमी झाल्याची माहिती आहे. टोलो टीव्हीच्या टेलिग्राम वाहिनीनुसार, अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील खैरखाना येथील 'अबुबकीर सेदिक' मशिदीत बुधवारी संध्याकाळी स्फोटाचा आवाज ऐकू आला.

तालिबानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, काबूलच्या PD-17 भागात हा स्फोट झाला. तालिबानी सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. मशिदीचा मौलवी अमीर मोहम्मद काबुली यांचाही या स्फोटात मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी