लक्षात ठेवा १९७१! अफगाणिस्तानने आठवण करुन देताच पाकिस्तान भडकला

अफगाणिस्तानचे पहिले उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी पाकिस्तानला उद्देशून एक ट्वीट केले. या ट्वीटमुळे पाकिस्तानमध्ये अस्वस्थता पसरली. सोशल मीडिया वापरणारे पाकिस्तानमधील अनेक युझर संतापले.

Afghanistan's first Vice President Amrullah Saleh shared a picture from 1971, Pakistanis got furious
लक्षात ठेवा १९७१! अफगाणिस्तानने आठवण करुन देताच पाकिस्तान भडकला 

थोडं पण कामाचं

  • लक्षात ठेवा १९७१! अफगाणिस्तानने आठवण करुन देताच पाकिस्तान भडकला
  • पाकमधून अफगाणिस्तान आणि तिथल्या मागील दोन दशकांतील राज्यकर्त्यांवर टीका
  • पाकिस्तानला मानसिक त्रास देण्याचा सालेह यांचा हेतू साध्य

काबुल: अफगाणिस्तानचे पहिले उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी पाकिस्तानला उद्देशून एक ट्वीट केले. या ट्वीटमुळे पाकिस्तानमध्ये अस्वस्थता पसरली. सोशल मीडिया वापरणारे पाकिस्तानमधील अनेक युझर संतापले. यामुळे पाकिस्तानला मानसिक त्रास देण्याचा सालेह यांचा हेतू साध्य झाला. Afghanistan's first Vice President Amrullah Saleh shared a picture from 1971, Pakistanis got furious

तालिबान्यांनी मागितली 15 वर्षांवरच्या मुलींची यादी

भारताने १९७१च्या युद्धात पाकिस्तानचा पराभव केला. पूर्व पाकिस्तानमधील पाकिस्तानच्या सैन्याने शरणागती पत्करली. ९० हजारांपेक्षा जास्त सैनिक भारताला शरण आले. यानंतर बांगलादेश या नव्या देशाचा जन्म झाला. यामुळे आजही पाकिस्तानसाठी १९७१चा पराभव हा भळभळती जखम आहे. पराभव झाल्यानंतर पूर्व पाकिस्तानमधील पाकिस्तानच्या सैन्याच्या सर्वोच्च अधिकाऱ्याने भारतीय सैन्यासमोर शरणगतीच्या कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या. याच घटनेची आठवण करुन देणारा फोटो अफगाणिस्तानचे पहिले उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी ट्वीट केला.

'आमच्या इतिहासात असा कोणताही फोटो नाही आणि नसेल. पण काल एक रॉकेट माझ्या डोक्यावरुन उडत पुढे जाऊन पडले आणि फुटले त्यावेळी मी हादरलो होतो... हा फोटो पाहून पाकिस्तानला होणारा त्रास तालिबान आणि दहशतवाद कधीच भरुन काढू शकत नाही. काही तरी वेगळा पर्याय शोधा!' असे टाइप करुन अफगाणिस्तानचे पहिले उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी १९७१च्या घटनेची आठवण करुन देणारा फोटो ट्वीट केला.

यानंतर अपेक्षेप्रमाणे सोशल मीडिया वापरणारे पाकिस्तानमधील अनेक युझर संतापले. त्यांनी अफगाणिस्तान आणि तिथल्या मागील दोन दशकांतील राज्यकर्त्यांवर टीका सुरू केली. अनेकांनी सालेह यांना लक्ष्य करुन ट्रोलिंग सुरू केले. काहींनी सालेह रॉकेटच्या स्फोटाने कसे घाबरले याचे चित्र काढून, कार्टून तयार करुन ते व्हायरल करायला सुरुवात केली.

याआधी अफगाणिस्तानने पाकिस्तानचे हवाई दल तालिबानला हवाई संरक्षण देण्याची तयारी करत असल्याचा आरोप केला होता. पाकिस्तान सरकारने हा आरोप फेटाळला होता. पण सोशल मीडियावर तालिबानी आणि पाकिस्तानचे जवान गप्पा मारत असल्याचे फोटो व्हायरल झाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी