श्रद्धाच्या पाठीवर जळती सिगरेट विझवायचा आफताब

Aftab used to burn Shraddha back with a cigarette bud know more about delhi murder case, Delhi Shraddha Murder Case News : श्रद्धा मर्डर केसमध्ये Times Now Navbharat वर किलर आफताबबाबत एक मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे.  'टाइम्स नाउ नवभारत'वर श्रद्धाच्या दोन मित्रांनी आफताबविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.

Aftab used to burn Shraddha back with a cigarette bud know more about delhi murder case, Delhi Shraddha Murder Case News
श्रद्धाच्या पाठीवर जळती सिगरेट विझवायचा आफताब  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • श्रद्धाच्या पाठीवर जळती सिगरेट विझवायचा आफताब
  • आफताब श्रद्धाला वारंवार वेदना देत होता
  • आफताब श्रद्धाला बेदम चोपायचा

Aftab used to burn Shraddha back with a cigarette bud know more about delhi murder case, Delhi Shraddha Murder Case News : श्रद्धा मर्डर केसमध्ये Times Now Navbharat वर किलर आफताबबाबत एक मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे.  'टाइम्स नाउ नवभारत'वर श्रद्धाच्या दोन मित्रांनी आफताबविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. दिल्ली पोलीस या माहितीचा उपयोग करून पुढील तपास करत आहेत. 

प्रेमाची हत्या, प्रेयसीचे केले 35 तुकडे

हजार रुपयांत दिल्ली फिरा

आफताब दररोज धूम्रपान करायचा. तो सिगरेट मुद्दाम श्रद्धाच्या पाठीवर विझवायचा. या पद्धतीने आफताब श्रद्धाला वारंवार वेदना देत होता. कोणत्याही कृतीला विरोध केला तर आफताब श्रद्धाला बेदम चोपायचा. काही वेळा श्रद्धाच्या चेहऱ्यावर इजा करायचा. अधूनमधून मी आत्महत्या करेन आणि त्या प्रकरणात तुला आणि तुझ्या घरच्यांना अडकवून जाईन असे सांगून घाबरवत होता. 

आफताबविषयी हे धक्कादायक खुलासे श्रद्धाचा मित्र गॉडविन याने केले. श्रद्धा आणि गॉडविन हे बेस्ट फ्रेंड होते. यामुळे गॉडविनने दिलेल्या माहितीची दिल्ली पोलीस चौकशी करत असल्याचे समजते. 

श्रद्धा तिच्या कुटुंबाला कोणताही त्रास होऊ नये म्हणून आफताब देत असलेला त्रास सहन करत होती. ओळखीतल्यांशी बोलत असताना आफताबचा कॉल आल्यास श्रद्धा दूर जाऊन बोलायची. गॉडविन आणि श्रद्धा यांचे शेवटचे बोलणे 4 मे 2022 रोजी झाले होते. यानंतर श्रद्धाच्या हत्येची बातमीच गॉडविनला कळली. 

श्रद्धाच्या एका फ्रेंडने सोशल मीडियावर डिसेंबर 2020 मधला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतही श्रद्धाच्या चेहऱ्यावर इजा झाल्याचे दिसत आहे. ही इजा आफताबमुळेच झाल्याचा दावा संबंधित फ्रेंडने केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी