श्रद्धा मर्डर केस प्रकरणी आफताबची नार्को टेस्ट होणार

श्रद्धा मर्डर केस प्रकरणी आफताबची नार्को टेस्ट होणार आहे. नार्को टेस्टआधी आफताबची पॉलिग्राफ टेस्ट अर्थात लाय डिटेक्टर टेस्ट होणार आहे. 

Aftab will undergo narco test in Shraddha murder case, shraddha walker murder case
श्रद्धा मर्डर केस प्रकरणी आफताबची नार्को टेस्ट होणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • श्रद्धा मर्डर केस प्रकरणी आफताबची नार्को टेस्ट होणार
  • नार्को टेस्टआधी आफताबची पॉलिग्राफ टेस्ट अर्थात लाय डिटेक्टर टेस्ट होणार
  • पोलीस चौकशीत आफताबने हत्येची कबुली दिली

Aftab will undergo narco test in Shraddha murder case, shraddha walker murder case : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसईची रहिवासी श्रद्धा वालकर (shraddha walker) हिची हत्या आफताब अमीन पूनावाला (Aftab Amin Poonawalla) याने केली. पोलीस चौकशीत आफताबने हत्येची कबुली दिली. याच प्रकरणात आणखी तपास करण्यासाठी आफताबची नार्को टेस्ट होणार आहे. नार्को टेस्टआधी आफताबची पॉलिग्राफ टेस्ट अर्थात लाय डिटेक्टर टेस्ट होणार आहे. 

आफताबची पॉलिग्राफ टेस्ट अर्थात लाय डिटेक्टर टेस्ट दिल्लीत फॉरेन्सिक सायन्स लॅब रोहिणी (एफएसएल रोहिणी) येथे होणार असल्याचे समजते. आफताबची नार्को टेस्ट आंबेडकर हॉस्पिटलमध्ये होणार असल्याचे समजते. कोर्टाने आफताबची नार्को टेस्ट करण्यासाठी 17 नोव्हेंबर 2022 रोजी परवानगी दिली आहे.

श्रद्धा मुंबईत मालाड येथे एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करत होती, त्यावेळी तिची आणि आफताबची ओळख झाली. दोघे लिव्ह इन मध्ये राहू लागले. श्रद्धाच्या या वर्तनाला घरून विरोध होऊ लागला. या विरोधाला उत्तर म्हणून श्रद्धा आणि आफताब महाराष्ट्र सोडून दिल्लीत राहू लागले. बहुराष्ट्रीय कंपनीत श्रद्धाची नोकरी सुरू होती. आफताब पण काम करत होता. पण दिल्लीत आल्यापासून दोघांमध्ये अधूनमधून वाद होत होते. वाद वाढला तर प्रत्येकवेळी आफताब आत्महत्या करेन अशी धमकी द्यायचा. मी आत्महत्या केली तर तू आणि तुझ्या घरच्यांना पोलीस अटक करतील असे सांगून आफताब श्रद्धाला घाबरवत होता. तसेच श्रद्धाला मारहाण करणे, तिच्या चेहऱ्यावर जखमा करणे, श्रद्धाच्या पाठीवर सिगरेट विझविणे, श्रद्धाला सतत शारीरिक आणि मानसिक त्रास देणे असे प्रकार आफताब करत होता. एक दिवस वाद सुरू असताना गळा आवळून आफताबने श्रद्धाची हत्या केली. नंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. हे तुकडे घरातल्या फ्रिजमध्ये ठेवले. यानंतर पुढील 5-6 महिन्यांत टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आफताबने श्रद्धाच्या शरीराच्या तुकड्यांची विल्हेवाट लावली. प्रामुख्याने छतरपूरच्या जंगलात त्याने श्रद्धाच्या शरीराच्या तुकड्यांची विल्हेवाट लावली. श्रद्धाचं डोकं (शिर) आफताबने मैदान गढी येथील तलावात (झील) फेकल्याचे पोलिसांना सांगितले. ही माहिती मिळताच पोलिसांनी मैदान गढी येथील तलावातले (झील) पाणी उपसून तिथे तपास सुरू केला आहे.

आफताब छतरपूरच्या जंगलात जात असल्याचे सीसीटीव्ही फूटेज पण पोलिसांच्या हाती आले आहे. या फूटेजच्या मदतीने पोलिसांनी छतरपूरच्या जंगलात तपास सुरू केला आहे. पोलीस पथकाने छतरपूरमधील मेहरौलीच्या जंगलातून 17 मानवी हाडे जप्त केली आहेत. या हाडांच्या वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. ही हाडे महिलेची किंवा तरुणीची असावीत असा प्राथमिक अंदाज आहे.

Shraddha Murder case: क्राईम सीरिज पाहून गर्लफ्रेंडचे 35 तुकडे केले, असं काय आहे या अमेरिकन टीव्ही शोमध्ये? 

Data Protection Bill : डेटा चोरी करणाऱ्यांची आता खैर नाही, भरावा लागेल 500 कोटी रुपयांचा दंड

श्रद्धाचे फ्रेंड, श्रद्धाशी फोनवरून बोललेले मुंबईतील एक डॉक्टर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. आफताबचे वर्तन यासंदर्भात श्रद्धाला ओळखणाऱ्यांकडून धक्कादायक गौप्यस्फोट सुरू आहेत. पोलीस या माहितीचाही तपासाकरिता उपयोग करून घेण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी