Shocking News : शवागाराच्या फ्रिजरमध्ये एक रात्र राहिल्यानंतर मृतदेहात आला जीव, post mortem च्या वेळी थरथरू लागला मृतदेह

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 22, 2021 | 13:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

मुरादाबाद येथील एकाचा अपघात अपघात झाला. तो गंभीर जखमी झाला असता त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, डाॅक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. मृतदेह एक रात्र शवागरातील फ्रिझरमध्ये ठेवला. दुसऱ्या दिवशी फ्रीझर उघडला. ती व्यक्ती पुन्हा 'जिवंत' झाल्याचे आढळून आले.

Shocking Viral News: After a night in the freezer of the morgue, the body began to move
पोस्टमार्टमच्यावेळीच व्यक्ती झाला जिवंत; थरथरू लागला मृतदेह  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुरादाबाद येथील एकाचा अपघात, डाॅक्टरांनी केलं मृत्यू घोषित
  • मृतदेह एक रात्र शवागरातील फ्रिझरमध्ये ठेवला
  • दुसऱ्या दिवशी फ्रीझर उघडला. ती व्यक्ती पुन्हा 'जिवंत' झाल्याचे आढळून आले.

मुरादाबाद : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून एक विचित्र घटना (Shocking) समोर आली आहे. शवागारात एका व्यक्तीचे शवविच्छेदन होणार होते. अत्यंत थंडीत सात तास मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवण्यात आला होता, मात्र पोस्टमॉर्टमपूर्वीच त्या व्यक्तीचे शरीर थरथरू लागले. यामुळे कुटुंबीय आणि डॉक्टरांना धक्का बसला आणि पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पाळापळ सुरु झाली. (Shocking Viral News: After a night in the freezer of the morgue, the body began to move)

अपघातात इलेक्ट्रिशियन गंभीर जखमी

ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील आहे. येथे राहणारे इलेक्ट्रिशियन श्रीकेश कुमार यांना भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकलने धडक दिली. अपघातानंतर त्याला गुरुवारी रात्री जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्या दिवशी मृतदेह फ्रीझरमध्ये ठेवला. 

सुमारे सात तास मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवण्यात आला होता. पंचनामा किंवा कागदपत्रावर मृतदेहाची ओळख पटल्यानंतर कुटुंबीयांना स्वाक्षरीसाठी पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये बोलावण्यात आले. मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी संमती द्यायची होती, त्यानंतरच मृताची वहिनी मधुबाला हिने फ्रीजरमध्ये जे ठेवले ते पाहून तिला धक्काच बसला. फ्रीझरमधलं शरीर थोडं हलल्याचं मधुबालाच्या लक्षात आलं. 

हे दुर्मिळ प्रकरणांपैकी एक

मुरादाबादचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिव सिंह म्हणाले, “आपत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्याने पहाटे ३ वाजता रुग्णाला पाहिले, जेव्हा त्याचे हृदय धडधडत नव्हते. त्यांनी त्या व्यक्तीची अनेकदा तपासणी केली होती. त्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले, मात्र सकाळी पोलीस पथक आणि त्याच्या कुटुंबीयांना तो जिवंत सापडला. चौकशीचे आदेश दिले आहेत. आता आमचे प्राधान्य त्याचे प्राण वाचवणे आहे.” सिंग म्हणाले की, हे दुर्मिळ प्रकरणांपैकी एक आहे.. याला आपण निष्काळजीपणा म्हणू शकत नाही.

त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली

"आम्ही डॉक्टरांविरुद्ध निष्काळजीपणाची तक्रार दाखल करू, कारण त्यांनी श्रीकेशला फ्रीजरमध्ये ठेवून जवळजवळ मारले," कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. त्याचवेळी श्रीकेश कुमार यांच्यावर आता मेरठ येथील आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी