Internet issue in Pakistan : वीज आणि पुरानंतर आता पाकिस्तानात नवं संकट, जगाशी तुटणार संपर्क

वीज गायब होणं आणि पूर या दोन संकटांचा पाकिस्तान सामना करत असतानाच आता तिसरं संकट समोर उभं ठाकलं आहे. पाकिस्तानमधील इंटरनेट सेवाच आता बंद पडू लागली आहे.

Internet issue in Pakistan
वीज आणि पुरानंतर पाकिस्तानात नवं संकट  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानात आलंय नवं संकट
  • अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा पडलीय बंद
  • वीज आणि पुरासोबत तिसऱ्या संकटाचा सामना

Internet Issue in Pakistan : पाकिस्तानमध्ये (Pakistan) गेल्या काही आठवड्यांपासून पुराचं (Flood) संकट निर्माण झालं आहे. पाकिस्तानात अनेक भागातील वीजही (Electricity) गायब झाली आहे. हे कमी म्हणून की काय, आता आणखी एक नवं संकट पाकिस्तानमध्ये निर्माण झालं आहे. पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट सेवा (Internet Service) हळूहळू बंद पडत चालली आहे. इंटरनेट वापरणाऱ्या आणि त्यावर काम अवलंबून असणाऱ्या शेकडो नागरिकांची त्यामुळे पंचाईत व्हायला सुरुवात झाली आहे. 

काय आहे कारण?

पाकिस्तानमध्ये इंटरनेट पुरवठा करणारी केबल खराब झाल्यामुळेच ही समस्या उद्भवल्याचं सांगितलं जात आहे. या केबलमध्ये काहीतरी बिघाड झाला असावा आणि तांत्रिक समस्या निर्माण झाली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या या समस्येची व्याप्ती नेमकी किती आहे, हेच सरकारला समजत नसल्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी बराच वेळ लागू शकतो, असं सांगितलं जात आहे. 

अधिक वाचा - Sonali Phogat: सोनाली फोगाटच्या मृत्यूपूर्वीचा आणखी एक धक्कादायक Video समोर

अनेक ठिकाणी पाऊस

सध्या पाकिस्तानात अनेक भागात पाऊस सुरू आहे. त्यामुळे कित्येक भागात अक्षरशः पूर आला आहे. यामुळे सर्वसामान्यांचं जनजीवन उद्ध्वस्त झालं आहे. अतिवृष्टी आणि पुराचा फटका ऑप्टिकल फायबरला बसला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र नेमका कुठे हा प्रॉब्लेम आला असावा आणि किती ठिकाणी आला असावा, याची चाचपणी कऱणं पुरामुळे आव्हानात्मक बनत चाललं असल्याचं चित्र आहे. 

आव्हान वाढण्याची चिन्हं

डेली डॉननं दिलेल्या वृत्तानुसार नजीकच्या भविष्यकाळात हे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन कंपनी लिमिटेड (PTCL) आणि पाकिस्तान टेलिकॉम ऑथोरिटीने याबाबतचा सविस्तर अहवाल लवकरात लवकर सादर करावा, असे आदेश पाकिस्तान सरकारनं दिले आहेत. 

अधिक वाचा - Firing over FB : फेसबुकवर चॅटिंग बंद केल्याचा राग, तरुणाने मित्रासोबत केला तरुणीवर गोळीबार

माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला फटका

इंटरनेट सेवा खंडित होत असल्याचा सर्वाधिक फटका माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला बसत आहे. अनेक ठिकाणी शहरातील पायाभूत सुविधा या इंटरनेटद्वारे नियंत्रित केल्या जातात. मात्र त्याचा पुरवठाच बंद झाल्यामुळे सेवा खंडित होत असल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी पूर आल्यामुळे तिथलं पाणी उपसण्यासाठी मोठमोठ्या यंत्रांचा वापर करण्यात आला होता. या यंत्रांमुळे जमिनीखालून जाणाऱ्या ऑप्टिकल फायबरचं नुकसान झालं असावं, असा अंदाज असा अंदाज पाकिस्तानच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी वर्तवला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम कऱणाऱ्या अनेक कंपन्यांचं काम यामुळे बंद पडलं आहे. अनेक कंपन्या सध्या कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करत आहेत. सध्याची सुट्टी ही पुरामुळे दिली जात असली तरी पूर ओसरल्यानंतरही जोपर्यंत इंटरनेट सेवा सुरळीत होत नाही, तोपर्यंत या कंपन्यांचं कामकाज बंदच राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी