इंग्लंड पाठोपाठ इटलीच्या पीएमनी दिला राजीनामा

After England Italy PM resigned : रशिया-युक्रेन संघर्ष सुरू असताना युरोपमधील दोन देशांमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याचे चित्र आहे. इंग्लंडमध्ये पीएम बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिला आहे. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच इटलीच्या पीएमनी पण राजीनामा दिला आहे.

Italian Prime Minister Mario Draghi resigns after his government implodes
इंग्लंड पाठोपाठ इटलीच्या पीएमनी दिला राजीनामा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • इंग्लंड पाठोपाठ इटलीच्या पीएमनी दिला राजीनामा
  • इटलीचे पीएम मारियो द्रागी यांनी आज गुरुवार २१ जुलै रोजी राजीनामा दिला
  • द्रागी यांच्या सरकारला भक्कम पाठिंबा देणाऱ्यांनी आपला पाठिंबा काढून घेतला

After England Italy PM resigned : रशिया-युक्रेन संघर्ष सुरू असताना युरोपमधील दोन देशांमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याचे चित्र आहे. इंग्लंडमध्ये पीएम बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिला आहे. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच इटलीच्या पीएमनी पण राजीनामा दिला आहे. (Italian Prime Minister Mario Draghi resigns after his government implodes)

इटलीचे पीएम मारियो द्रागी यांनी आज गुरुवार २१ जुलै रोजी राजीनामा दिला. द्रागी यांच्या सरकारला भक्कम पाठिंबा देणाऱ्यांनी आपला पाठिंबा काढून घेतला आहे. यानंतर पीएम मारियो द्रागी यांनी राजीनामा दिला. राष्ट्रपति सर्गियो मैत्तरेला यांच्याकडे पीएम मारियो द्रागी यांनी राजीनामा दिला. राष्ट्रपतींनी मारियो द्रागी यांना हंगामी पीएम म्हणून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नवे पीएम सूत्रं हाती घेईपर्यंत द्रागी हेच हंगामी पीएम म्हणून देशाचा कारभार हाताळतील.

कोरोना संकट आणि वाढती महागाई यामुळे इटलीतील नागरिकांमध्ये पीएम मारियो द्रागी यांच्याविषयीची नाराजी वाढू लागली. या नाराजीचा फटका बसेल याची जाणीव होताच द्रागी यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्याचे जाहीर केले. यानंतर इटलीचे पीएम मारियो द्रागी यांनी राजीनामा दिला. 

...म्हणून बोरिस जॉन्सन यांनी दिला राजीनामा

जून २०२२ मध्ये बोरिस जॉन्सन सरकारने बहुमत चाचणीचा अडथळा पार केला होता. जॉन्सन सरकारला २११ जणांचे समर्थन मिळाले होते तर १४८ जणांनी विरोध केला होता. बहुमताची चाचणी पार केल्यामुळे सरकार सुरक्षित आहे अशी चर्चा होती. पण जॉन्सन यांनी महत्त्वाची जबाबदारी दिलेल्या एका खासदारावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले. गंभीर आरोप होऊनही संबंधित खासदाराचा बोरिस जॉन्सन यांनी  बचाव केला. यामुळेच परिस्थिती बिघडली. धडाधड मंत्र्यांनी राजीनामे सादर केले. तीन दिवसांत जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील ४० सदस्यांनी राजीनामे दिले. राजीनामा देणाऱ्यांमध्ये ऋषी सुनक यांचाही समावेश होता. वाढत्या दबावाला सहन करणे अशक्य झाल्यामुळे अखेर बोरिस जॉन्सन यांनी इंग्लंडच्या पीएम पदाचा राजीनामा दिला.

इंग्लंडच्या पीएम पदासाठी भारतीय वंशाचे ऋषी सुनक आघाडीवर

इंग्लंडचे माजी अर्थमंत्री आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती यांचे जावई ऋषी सुनक हे प्राईम मिनिस्टर अर्थात पीएम पदाच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत. बोरिस जॉन्सन यांनी इंग्लंडच्या पीएम पदाचा राजीनामा दिल्यानंतर सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पार्टीने अंतर्गत निवडणूक प्रक्रिया राबवून पीएम पदासाठी सक्षम उमेदवार निवडण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत पार्टीने अंतर्गत पातळीवर पाच निवडणुका घेतल्या. या सर्व निवडणुकांमध्ये ऋषी सुनक विजयी झाले. आता पार्टीकडून ऋषी सुनक आणि लिझ ट्रुस यांच्यातून एका व्यक्तीची पीएम पदासाठीचा नेता म्हणून निवड होईल. हीच व्यक्ती इंग्लंडची पीएम होणार आहे. याआधी अंतर्गत पातळीवर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत सर्वात कमी मते मिळविणारे उमेदवार बाद होत गेले आणि पाचव्या फेरीअंती ऋषी सुनक आणि लिझ ट्रुस हे दोन उमेदवार विजयी होऊन पीएम पदाचे दावेदार झाले आहेत. या दोघांमधून पार्टी एका व्यक्तीची निवड करणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी