दहावीच्या परीक्षेत 56 वेळा नापास, पास होताच 77 वर्षांचे आजोबा करताय बारावीचा अभ्यास

राजस्थानमधील (Rajasthan) 77 वर्षीय व्यक्तीचा शिक्षणाविषयीची (Education) जिद्दी पाहिली तर आपण सर्वजण तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाहीत. शिक्षणासाठी वय लागत नाही, असं म्हटलं जातं या वाक्यचं उदाहरण म्हणजे राजस्थानमधील हुकमदास वैष्णव (Hukamdas Vaishnav) बाबा.

77-year-old grandfather started studying for the 12th class
57 व्या प्रयत्नात 10 वी पास होणारे आजोबा देणार 12वीचे पेपर  |  फोटो सौजन्य: Google Play

नवी दिल्ली :  राजस्थानमधील (Rajasthan) 77 वर्षीय व्यक्तीचा शिक्षणाविषयीची (Education) जिद्दी पाहिली तर आपण सर्वजण तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाहीत. शिक्षणासाठी वय लागत नाही, असं म्हटलं जातं या वाक्यचं उदाहरण म्हणजे राजस्थानमधील हुकमदास वैष्णव (Hukamdas Vaishnav) बाबा. हुकमदास यांना शिक्षणाची एवढी आवढ आहे की दहावीत (X) 56 वेळा नापास होऊनही  त्यांनी शिक्षणाची कास न सोडता 57 व्या प्रयत्नात त्यांनी दहावी पास केली आणि आता त्यांनी थेट बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरला आहे.  

आपल्या या शिक्षणाविषयीच्या कसोटी आणि अपयश आले तरी प्रयत्न करत  राहणे आणि त्यावर यश मिळवणे या त्यांच्या वृत्तीमुळे जालोर जिल्ह्यातील तरुणांपुढे एक आदर्श ठेवला आहे. जे तरुण छोट्याशा अपयशामुळे आपलं जीवन संपवत असतात, अशा तरुणांसाठी हुकमदास एक प्रेरणा बनत आहेत. तुम्ही आम्ही पाहिलं असेल की, साधरण पाच ते सहा वेळा नापास झाल्यानंतर लोक परीक्षेचा विचार सोडून देतात. पण हुकमदास यांनी  कमाल केली आहे. हुकमदास यांनी 1962 पासून दहावी पास होण्यासाठी  प्रयत्न केले, जे 2019 मध्ये  यशस्वी झाले. हुकमदास यांना आठवी पास केल्यानंतर नोकरी मिळाली होती. 

हुकम दास  यांनी सांगितले की, दहावी पहिल्यांदा नापास  झाल्यानंतरी वयाच्या 18 व्या वर्षी त्यांना सरकारी नोकरी मिळाली. नोकरी मिळााल्यानंतरही त्यांचे शिक्षणावरील प्रेम कमी झाले नाही. त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. त्यांच्या मित्रांनी त्यांना आव्हान दिले होते की, ते  कधीच दहावीची  परीक्षा पास होऊ शकत नाही, पण त्यांनी प्रयत्न सोडला नाही. आता हुकमदास यांनी जालोर शहरातील शासकीय उुच्च माध्यमिक  विद्यालय येथे बारावी कली शाखेत अर्ज भरला आहे.  विशेष म्हणजे  आता त्यांच्या नातावानेही शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी