Al Qaeda leader: जवाहिरीनंतर आता 'या' दहशतवाद्याच्या शोधात अमेरिका, माहिती देणाऱ्याला मिळणार कोट्यवधींचं बक्षीस

Al Qaeda leader Ayman al-Zawahiri killed: 2011 मध्ये ओसामा बिन लादेनला (Osama Bin Laden) कंठस्नान घालण्यात आलं. त्यानंतर अल कायदाला बसलेला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

Muhammad Abbatay
मोहम्मद अब्बाते  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा (Al-Qaeda Leader) प्रमुख अयमान अल-जवाहिरी (Ayman-al-zawahiri) ठार झाल्याचं वृत्त आहे.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
  • 2011 मध्ये ओसामा बिन लादेनला (Osama Bin Laden) कंठस्नान घालण्यात आलं.

वॉशिंग्टन: US drone strike kills al-Qaeda leader in Afghanistan: अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा (Al-Qaeda Leader) प्रमुख अयमान अल-जवाहिरी (Ayman-al-zawahiri)  ठार झाल्याचं वृत्त आहे. अफगाणिस्तानात (Afghanistan)  सीआयएनं केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरीचा खात्मा झाल्याचं अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अल-जवाहिरीवर  25 मिलियन डॉलरचं बक्षीस जाहीर करण्यात आले होते.  2011 मध्ये ओसामा बिन लादेनला (Osama Bin Laden) कंठस्नान घालण्यात आलं. त्यानंतर अल कायदाला बसलेला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान जवाहिरीनंतर आता अमेरिका (America) कोणाचा शोधात आहे असा प्रश्न पडला आहे. 

जवाहिरीच्या मृत्यूनंतर अमेरिका आता त्याचा जावई मोहम्मद अब्बाते याचा शोध घेत आहे. मोहम्मद अब्बाते हा दहशतवादी संघटना अल कायदाचा वरिष्ठ नेता आहे. अब्द-अल-रहमान अल-मघरेबी उर्फ ​​अब्बातेसाठी  7 मिलियन डॉलरचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे. तो AQ च्या मीडिया विंग अल-साहबचे संचालक देखील आहे.

अधिक वाचा- सारा अली खानला केलं जातंय भयंकर ट्रोल

ज्याला अल-मघरेबीबद्दल माहिती आहे. तो सिग्नल, टेलिग्राम किंवा व्हॉट्सअॅपद्वारे मेसेज करून माहिती देऊ शकतो, असं अमेरिकेनं दहशतवादी मघरेबीबद्दल म्हटलं आहे. अमेरिकेकडून यासाठी एक नंबरही जारी करण्यात आला आहे. याची माहिती देणाऱ्या व्यक्तीला 7 मिलियन डॉलरचे बक्षीस देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मोहब्बत अब्बाते या दहशतवाद्याला अब्द-अल-रहमान अल-मघरेबी म्हणूनही ओळखले जाते. अब्बाते इराणमध्ये आहे, असा अमेरिकेकडून दावा करण्यात येत आहे. मात्र, तो सध्या कुठे आहे, याबाबत स्पष्ट माहिती नाही आहे. 

अमेरिका त्याचा शोध घेत असून अब्बाते हा मोरक्कोमध्ये जन्मलेला दहशतवादी अल-जवाहिरीचा जावई आहे. मोहब्बत अब्बाते सुद्धा त्याच्या अल-कायदामधील सदस्यत्वासंदर्भातल्या चौकशीसाठी इच्छित आहे. अल कायदा संघटनेनं अमेरिकेत अनेक दहशतवादी घटना घडवून आणल्या आहेत. 

अफगाणिस्तानात जाण्यापूर्वी मघरेबीने जर्मनीमध्ये सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगचा अभ्यास केला. अफगाणिस्तानात गेल्यानंतर त्यांना प्राथमिक माध्यम शाखेच्या व्यवस्थापनावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आले. अमेरिकेत 11 सप्टेंबर 2001 च्या दहशतवादी घटनांनंतर अल मघरेबी इराणला पळून गेला. असं म्हटलं जात की, तो पळून गेला. त्यानं इराण आणि पाकिस्तान दरम्यान प्रवास करत राहिला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी