पत्नी, मेव्हणी आणि सासू हत्या करुन मृतदेहावर बलात्कार, आरोपीने दिली कबुली 

Murder and Rape Case: पत्नी, मेव्हणी आणि सासूची हत्या केल्यानंतर आरोपीने तिघींच्या मृतदेहावर बलात्कार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.

triple_murder
पत्नी, मेव्हणी आणि सासू हत्या करुन मृतदेहावर बलात्कार, आरोपीने दिली कबुली   |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • पत्नी, सासू आणि मेव्हणीची केली हत्या
  • हत्येनंतर तिघींच्या मृतदेहावर आरोपीने केला बलात्कार
  • पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन घडलं हत्याकांड

चंदीगड: हरियाणा पोलिसांनी नुकत्याच झालेल्या तिहेरी हत्येचा (Triple Murder) उलगडा केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीत अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी, एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ज्याने या प्रकरणी अत्यंत धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. आरोपीने आपला गुन्हा कबूल करताना पोलिसांना सांगितलं की, त्याने आपली पत्नी, (wife) मेव्हणी (sister-in-law) आणि सासू (mother-in-law) यांना ठार मारले आणि नंतर तिघींच्या मृतदेहांवर बलात्कार (Rape) केला. ही घृणास्पद घटनी हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील असल्याचं समजतं आहे.

ही घटना ६ सप्टेंबरली घडली होती. याप्रकरणी २७ वर्षीय आरोपी नूर हसन याला अटक करण्यात आली आहे. तो सोनीपत जिल्ह्यातील पट्टी कलियानाचा रहिवासी आहे. त्याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, हत्या केल्यानंतर आरोपीने तिन्ही मृतदेहावर बलात्कार केला. तीनही महिलांचे मृतदेह ६ सप्टेंबर, ७ सप्टेंबर आणि ८ सप्टेंबर रोजी वेगवेगळ्या ठिकाणी सापडले होते. त्यामुळे याप्रकरणी हरियाणा पोलिसांवर बराच दबाव देखील होता. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक करुन या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आहे. 

पोलिसांनी माहिती देताना सांगितलं आहे की, त्या व्यक्तीने तिन्ही महिलांची हत्या करुन त्यांच्यावर मृतदेहावर बलात्कार केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला आपल्या पत्नीवर संशय होता की, तिचे विवाहबाह्य संबंध असून या सगळ्यात तिला सासू आणि मेहुणी देखील   पाठिंबा देत आहेत. त्यामुळेच आरोपीने या तिघींची हत्या केली होती. या घटनेनंतर ११ सप्टेंबर रोजी पानिपत डीएसपी अंतर्गत एसआयटी चौकशी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबर रोजी आरोपीने प्रथम पत्नी आणि मेव्हणीला अंमली औषध दिली आणि त्यानंतर त्याने दोघींची धारदार शस्त्राने हत्या केली. या दोघींचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्यानंतर त्याने ८ सप्टेंबर रोजी आपल्या सासूची गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर एका वेगळ्याच ठिकाणी तिचा मृतदेह जाळून ओळख लपविण्याचा प्रयत्न केला. पण मृतदेह पूर्णपणे जळू न शकल्याने त्याने तिसऱ्याच ठिकाणी मृतदेह नेऊन टाकला. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा आपली पत्नी व त्यांच्या दोन मुलांसह भाड्याच्या घरात राहत होता. दरम्यान, पोलिसांनी आरोपींविरोधात भादंवि कलम ३०२ आणि २०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी