Jharkhand News: झारखंड राज्यातील साहिबगंज जिल्ह्यात (Sahibganj) दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाची (Shraddha Walkar Murder Case) पुनरावृत्ती झाली आहे. एक 25 वर्षीय तरुणीची पतीने निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे कटर मशीननं अनेक तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अधिक वाचा : बांगलादेशला हरवत भारताने जिंकली पहिली टेस्ट
Jharkhand Crime News: संपुर्ण देश श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर सावरत असतानाच पुन्हा एका गुन्ह्याने नागरिकांचं हृदय हेलावून टाकलं आहे. वालकर प्रकरणात नवनवे होत असताना झारखंड राज्य (Jharkhand Crime)अशाच प्रकारच्या हत्याकांडाने हादरले आहे. झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यातील बोरियो गावात एका 25 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करून कटर मशीनच्या (Cutter Machine)मदतीने तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मृत तरुणीने प्रेमविवाह (Love Marriage)केला होता.
अधिक वाचा : रविवारी नौदलात दाखल होणाऱ्या विनाशिकेवर 2 मराठी अधिकारी
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव रबिता पहाडिन (वय-25) असं आहे. रबिता हिने दिलदार अन्सारी नामक तरुणाशी प्रेमविवाह केला होता. रबिताच्या हत्येप्रकरणी पती दिलदार अन्सारी आणि त्यांच्या नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली आहे. मो.मुस्तकीम अन्सारी,मरियम खातून, दिलदार अन्सारी, गुलेरा, अमीर अन्सारी, महताब अन्सारी, शारेजा खातून (सर्व रा. बोरियो बेल टोला) अशी आरोपींची नावे असून पोलिस त्यांची कसून चौकशी करत आहेत.
रबिताची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे कटर मशीनने अनेक तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याचा आरोप दिलदार अन्सारी आणि त्याच्या नातेवाईकांवर करण्यात आला आहे.
अधिक वाचा : FIFA World Cup 2022 Final :अर्जेंटिना-फ्रान्स यांच्यात फायनल
मृत रबिता पहाडिनचे दिलदार अन्सारीवर प्रेम होतं. दिलदार हा आधीच विवाहित होता. तरी देखील रबिताने त्याच्याशी लग्न केलं. मात्र, या विवाहानंतर दिलदारची पहिली पत्नी आणि त्याचे नातेवाईक नाराज होते. पती आणि आई-वडील नाराज असल्याने दिलदारने रबिता हिला बोरियो येथील हेमंती मुर्मू यांच्या घरात ठेवलं होतं. दिलदार याने हे घर 2000 रुपये प्रतिमहिना भाडेतत्त्वावर घेतले होते. दिलदार याने रबिता हिला केवळ पाच-सहा दिवस भाड्याच्या घरात ठेवलं. नंतर तो तिला बोरियो बेल टोला येथील स्वतःच्या घरात घेऊन गेला होता.
दिलदारची आई मरियम खातूनने शुक्रवारी रबिताला तिचा भाऊ मोईनुल अन्सारीच्या घरी म्हणजेच बोरियो मांझ टोला येथे नेलं. तिथे रबिता हिची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर कटर मशीनने रबिताच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले. नंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले. शनिवारी अनेक भागात मानवी शरीराचे अवयव सापडल्याने पोलिसांनी रबिता पहाडिन हत्याकांडाचा खुलासा केला. पोलिसांनी दिलदार अन्सारीसह त्यांच्या नातेवाईकांना अटक केली आहे.