Electricl Vehicle Fire : पुण्यानंतर चेन्नईत इलेक्ट्रिक स्कूटरला आग, व्हिडीओ व्हायरल, एकाच आठवड्यातील चौथी घटना

नुकतीच पुण्यात ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ही घटना ताजी असताना तमिळनाडूतही अशी घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच कंपनीने दखल घेतली असून याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. 

electric scooter fire
इलेक्ट्रिक स्कूटरला आग   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • नुकतीच पुण्यात ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
  • ही घटना ताजी असताना तमिळनाडूतही अशी घटना समोर आली आहे.
  • तमिळनाडूत हायवेला पार्क असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली आहे.

नुकतीच पुण्यात ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ही घटना ताजी असताना तमिळनाडूतही अशी घटना समोर आली आहे. तमिळनाडूत हायवेला पार्क असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच कंपनीने दखल घेतली असून याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.  (after pune incident chennai electric vehicle caught fire video viral )

चेन्नईच्या एका हायवेच्या बाजूला एक इलेक्ट्रिक स्कूटर उभी होती. अचानक या स्कूटरने पेट घेतला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुण्यात अशाच प्रकारे ओलाच्या S1 pro स्कूटरला आग लागली होती. तेव्हा कंपनीने या घटनेची दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. चेन्नईत आग लागलेल्या स्कूटरची कंपनी Pure EV आहे. तसेच Pure EV च्या स्कूटरला आग लागाण्याची ही तिसरी वेळ आहे. अशा प्रकारे आधी दोन वेळा Pure EV च्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली होती. सप्टेंबर महिन्यात Pure EV च्या इलेक्ट्रिक स्कूटरला अशा प्रकारे दोन वेळा आग लागली होती. तमिळनाडूच्या वेल्लोर शहारमध्ये अशा प्रकारे इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली होती. त्यात एक बाप आणि त्याच्या १३ वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू झाला होता. 

पुण्यात इलेक्ट्रिक स्कूटरला आग
सध्या सगळीकडे इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला आहे. पेट्रोल डिझेल महाग होत असल्याने ग्राहकांचा कल या इलेक्ट्रिक वेहिकलकडे आहे. सरकारकडूनही या इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जाते. तसेच या गाड्यांमध्ये पेट्रोल डिझेल ऐवजी वीज लागत असल्याने या गाड्यांमुळे प्रदुषण होत नाही. असे असले तरी या गाड्यांचे काही दुष्परिणाम समोर येत आहे. ओलाने नुकतंच आपली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली होती. या गाडीसाठी जेव्हा ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झाले तेव्हा ओलाची साईट डाऊन झाली होती. आता ओलाच्या स्कूटरला आग लागल्यामुळे ग्राहकांमध्ये एकच भिती पसरली आहे. ओला कंपनीने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. कंपनीने जारी केलेल्या सूचनेनुसार हा व्हिडीओ कंपनीच्या निदर्शनास आल्याचे म्हटले आहे. या घटनेचा तपास केला जाईल. तसेच ग्राहकांची सुरक्षिता आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची असल्याचे कंपनीने सांगितले आहे. 

Ola S1 Pro electric scooter  मध्ये ३3.97kWh  लिथियम आयोने बॅटरी असते. ही बॅटरी इलेक्ट्रिक वाहन आणि इलेक्ट्रिक वस्तूंमध्ये वापरली जाते. जेव्हा ही बॅटरी व्यवस्थित बनवली जात नाही तेव्हा या बॅटरीला आग लागते. तसेच ही बॅटरी चालवण्यासाठी योग्य सॉफ्टवेअर नसल्यास आग लागते अशी  माहिती तज्ञांनी दिली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी