President Election 2022: शरद पवारांच्या नकारानंतर विरोधकांमध्ये राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारासाठी 'या' नावांवर चर्चा

पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी (presidential election) विरोधी पक्ष (Opposition) आणि सत्ताधारी पक्षाकडून (Ruling party) आप-आपल्या उमेदवारासाठी हालचाल केली जात आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी संयुक्त उमेदवारावर एकमत होण्यासाठी 17 विरोधी पक्षांच्या (Opposition Parties) नेत्यांची बैठक झाली.

Discussion on 'these' names for presidential candidate
राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारासाठी 'या' नावांवर चर्चा  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत समान उमेदवार उभे करण्यास विरोधी पक्षांनी सहमती दर्शवली आहे.
  • गोपाळकृष्ण गांधी आणि फारुख अब्दुल्ला यांच्यावर चर्चा
  • भाजपकडून राजनाथ सिंह आणि पक्षप्रमुख जेपी नड्डा (JP Nadda) इतर पक्षांशी सल्लामसलत करण्याचे काम करणार

नवी दिल्ली: पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी (presidential election) विरोधी पक्ष (Opposition) आणि सत्ताधारी पक्षाकडून (Ruling party) आप-आपल्या उमेदवारासाठी हालचाल केली जात आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी संयुक्त उमेदवारावर एकमत होण्यासाठी 17 विरोधी पक्षांच्या (Opposition Parties) नेत्यांची बैठक झाली. तर भाजपचे ज्येष्ठ नेते (Senior BJP Leader) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) टीएमसीच्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि सपाचे अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यासह प्रमुख विरोधी नेत्यांची भेट घेतली. भाजपने राजनाथ सिंह आणि पक्षप्रमुख जेपी नड्डा (JP Nadda) यांना इतर पक्षांशी सल्लामसलत करण्याचे काम दिलं आहे.

दरम्यान, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत समान उमेदवार उभे करण्यास विरोधी पक्षांनी सहमती दर्शवली आहे. मात्र सक्रिय राजकारण सोडण्यास तयार नसलेले राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विरोधी पक्षाचा एकमुखी उमेदवार होण्यास नकार दिल्याने अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही. 17 विरोधी पक्षांच्या बैठकीत पवारांनी नकार दिल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांना उमेदवार म्हणून सुचवले आहे. मात्र प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेससह अन्य पक्षांनी अद्याप या दोघांसह कोणतेही नाव सुचवलेले नाही.

दिल्लीच्या कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रमुखांनी बोलावलेल्या या बैठकीत सर्व पक्षांनी शरद पवार यांना विरोधी पक्षांचे एकमताने उमेदवार होण्याचा आग्रह धरला, मात्र पवारांनी शेवटपर्यंत सक्रिय राजकारणात राहायचे आहे, असे सांगून ही ऑफर धुडकावून लावली. मग ममता बॅनर्जी यांनी गोपाळकृष्ण गांधी आणि फारुख अब्दुल्ला यांची नावे सुचवली आणि बाकीच्या पक्षांना त्यांची निवड करण्यास सांगितले. मात्र सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपल्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करूनच याबाबत काही बोलू, असे सांगितले.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत या पक्षांना महत्त्वाची भूमिका बजावायची आहे आणि अशा स्थितीत विरोधकांसाठी ते सकारात्मक लक्षण नाही. ममता यांच्याशिवाय विरोधी पक्षातील एकही मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित नव्हता. तसे, ममतांनी पुढाकार घेतला असला तरी आता काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार हे राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराबाबत विरोधी राजकारण करतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी