Facilities To former Presidents: वारे व्वा ! कार्यकाळ संपल्यानंतर माजी राष्ट्रपतींची मज्जा, मिळणार मोफत लँडलाइन आणि मोबाईल फोन

राष्ट्रपतीपदाला (President) विषेश महत्व आहे. राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरीक (citizen) असतात. रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ 24 जुलै रोजी पूर्ण झाला. तर आज द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती असताना रामनाथ कोविंद हे देशातील सर्वात भव्य निवासस्थानी म्हणजे राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan) राहत होते.

Facilities To former Presidents
कार्यकाळ संपल्यानंतर माजी राष्ट्रपतींना मिळणार पेन्शन  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रपतीपदावर असताना राष्ट्रपतींना महिना पाच लाख रुपये पगार दिला जातो.
  • राष्ट्रपतींच्या जोडीदाराला (नवरा किंवा बायको) महिना 30 हजार रुपये सचिवीय सहाय्य दिलं जातं.
  • राष्ट्रपतींच्या देश-विदेशातील प्रवासाचा खर्च केंद्र सरकार उचलते

Facilities To former Presidents: राष्ट्रपतीपदाला (President) विषेश महत्व आहे. राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरीक (citizen) असतात. रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ 24 जुलै रोजी पूर्ण झाला. तर आज द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती असताना रामनाथ कोविंद हे देशातील सर्वात भव्य निवासस्थानी म्हणजे राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan) राहत होते. या पदावर असताना त्यांना अनेक सोयीसुविधांसह मोठा पगार (Presidents salary) मिळत होता. परंतु आता राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना किती पेन्शन मिळणार? त्यांचे जीवन कसे असणार अशी प्रश्ने तुमच्या मनात आली असतील याची माहिती आम्ही यात देत आहोत. 

राष्ट्रपतीपदावर असताना राष्ट्रपतींना महिना पाच लाख रुपये पगार दिला जातो. राष्ट्रपतींच्या जोडीदाराला (नवरा किंवा बायको) महिना 30 हजार रुपये सचिवीय सहाय्य म्हणून दिले जाते. तर वी दिल्लीतील ‘राष्ट्रपती भवन’ हे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान असते. पाच एकरमध्ये पसरलेल्या या भवनात 340 खोल्या आहेत. या भवनात राष्ट्रपतींच्या सेवेसाठी जवळपास 200 कर्मचारी असतात. राष्ट्रपतींच्या देश-विदेशातील प्रवासाचा खर्च केंद्र सरकार उचलते. राष्ट्रपतींसोबतच त्यांच्या जोडीदारालाही रेल्वे तसेच विमानात निशुल्क प्रवास करण्याची परवानगी असते.

Read Also: पुढील तीन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

आयुष्यभर राहण्यासाठी घर आणि वैद्यकीय सुविधा केंद्र सरकारकडून पुरवल्या जातात. घरात काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महिना ६० हजार रुपये एक मोबाईल आणि टेलिफेन कनेक्शनही दिले जाते. या सोयी पदावर असताना मिळत असतात. परंतु राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपल्यानंतर यात काय बदल होत असतो ते आपण जाणून घेणार आहोत.

Read Also : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पूरग्रस्त भागाचा दौरा

आजपासून देशाला नवीन राष्ट्रपती मिळाल्या आहेत. परंतु गत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं जीवन कसं असणार याविषयी आपण जाणून घेणार आहोत. देशाच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही रामनाथ कोविंद सुख सुविधांनी परिपूर्ण आयुष्य जगणार आहेत. देशाच्या सर्वोच्च पदावरून निवृत्त झाल्यानंतर रामनाथ कोविंद यांना सरकारकडून अनेक भत्ते आणि सुविधा मिळणार आहेत. माजी राष्ट्रपती म्हणून त्यांना राहण्यासाठी सरकारी निवासस्थान दिले जाईल. यासोबतच त्यांना भरघोस पेन्शनही मिळणार आहे. 

Read Also:भाजप उपाध्यक्षाच्या फार्महाऊसवरच व्हायचा वेश्या व्यवसाय

कोणत्या मिळणार सुविधा?

  • राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर रामनाथ कोविंद यांना आयुष्यभरासाठी दरमहा दीड लाख रुपये पेन्शन मिळणार आहे.
  • माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची जोडीदार सवित कोविंद यांनाही दरमहा 30 हजार रुपयांची सेक्रेटेरियल मदत दिली जाणार आहे.
  • रामनाथ कोविंद आणि त्यांच्या कुटुंबीयांना पूर्ण सुसज्ज बंगला दिला जाणार आहे.
  • रामनाथ कोविंद यांना मोफत लँडलाइन आणि मोबाईल फोनचीही सुविधा मिळणार आहे.
  • रामनाथ कोविंद यांना माजी राष्ट्रपती म्हणून पाच लोकांचा वैयक्तीक स्टाफही मिळणार आहे. तसेच स्टाफच्या खर्चासाठी त्यांना वर्षाला 60 हजार रुपयेही मिळतील.
  • रामनाथ कोविंद यांना त्यांची पत्नी सविता कोविंद यांच्यासोबत रेल्वे किंवा विमानाने मोफत प्रवास करण्याची सुविधाही मिळेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी