Chardham Yatra 2022 : तब्बल दोन वर्षानंतर उघडलं बद्रीनाथ धामचे दार, कोरोना संकटानंतर भाविकांमध्ये यात्रेचा उत्साह

हिवाळ्यात बंद असलेले बद्रिनाथ धामचे (Badrinath Dham) दरवाजे आज सकाळी 6 वाजता उघडण्यात आले. गेल्या दोन वर्षाच्या कोरोना (Corona) संकटानंतर यंदा बद्रिनाथमध्ये यात्रेचा उत्साह पाहायला मिळत आहे. सध्या बद्रिनाथ परिसरामध्ये कडाक्याची थंडी आहे. मात्र, या थंडीतही हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

Badrinath Dham was opened
बद्रिनाथ धामचे उघडले दरवाजे, भाविकांमध्ये यात्रेचा उत्साह  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कोरोना निर्बंधांमध्ये सूट देण्यात आल्यानं यंदा बद्रिनाथ यात्रेत विक्रमी गर्दी होण्याची शक्यता
  • दरवाजे उघडण्यापूर्वी बद्रीनाथ मंदिर फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आलं होतं.
  • बद्रीनाथ धामचे दरवाजे रविवारी सायंकाळी 6.15 वाजता धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि लष्करी बँडच्या सुरांनी भाविकांसाठी खुले करण्यात आले

Chardham Yatra 2022 : उत्तराखंड:  हिवाळ्यात बंद असलेले बद्रिनाथ धामचे (Badrinath Dham) दरवाजे आज सकाळी 6 वाजता उघडण्यात आले. गेल्या दोन वर्षाच्या कोरोना (Corona) संकटानंतर यंदा बद्रिनाथमध्ये यात्रेचा उत्साह पाहायला मिळत आहे. सध्या बद्रिनाथ परिसरामध्ये कडाक्याची थंडी आहे. मात्र, या थंडीतही हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. कोरोना निर्बंधांमध्ये सूट देण्यात आल्यानं यंदा बद्रिनाथ यात्रेत विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. तब्बल दोन वर्षानंतर यंदा बद्रिनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेता येणार आहे. 

दरम्यान एका दिवसात केवळ 12 हजार भाविक केदारनाथ आणि 15 हजार बद्रीनाथला भेट देऊ शकतील. आज सकाळपासूनच बद्रीनाथ धाममध्ये भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. बद्रीनाथ धामचे दरवाजे आज रविवारी भाविकांसाठी खुले करण्यात आले. दरवाजे उघडण्यापूर्वी बद्रीनाथ मंदिर फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आलं होतं. बद्रीनाथ धामचे दरवाजे रविवारी सायंकाळी 6.15 वाजता धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि लष्करी बँडच्या सुरांनी भाविकांसाठी खुले करण्यात आले. बद्रीनाथ धाममध्ये भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत.

भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण 

चारधाम यात्रेत (Chardham Yatra 2022) मोठ्या संख्येने भाविक येतील असा अंदाज आहे. पण एका दिवसांत केवळ 15 हजार भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे. दर्शनासाठी पर्यटन विभागाच्या वेबसाइटवर नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी