Fuel Price Cut: केंद्र सरकारपाठोपाठ या दोन राज्यांनी घटवल्या पेट्रोल डिझेलच्या किंमती, भाजप शासित राज्यांवर दर कमी करण्याचा दबाव

नुकतंच केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून इंधनावरील दर कमी केले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना महागाईतून थोडासा दिलासा मिळाला आहे. आता दोन राज्यांनी करकपात करून पेट्रोल डिझेलचे दर कमी केले आहेत. राजस्थान आणि केरळने पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करून इंधनाचे दर कमी केले आहेत.

petrol diesel price
पेट्रोल डिझेलच्या किंमती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नुकतंच केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून इंधनावरील दर कमी केले आहेत.
  • यामुळे सर्वसामान्यांना महागाईतून थोडासा दिलासा मिळाला आहे.
  • आता दोन राज्यांनी करकपात करून पेट्रोल डिझेलचे दर कमी केले आहेत.

Fuel Price Cut : नवी दिल्ली : नुकतंच केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून इंधनावरील दर कमी केल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना महागाईतून थोडासा दिलासा मिळाला आहे. आता दोन राज्यांनी करकपात करून पेट्रोल डिझेलचे दर कमी केले आहेत. राजस्थान आणि केरळने पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करून इंधनाचे दर कमी केले आहेत.

राजस्थानमध्ये इंधन दरांत घट

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करून ही घोषणा केली आहे. राजस्थान सरकारने पेट्रोलवरील २.४८ रुपये तर डिझेलवरील १.१६ रुपये व्हॅट कमी केला आहे. यामुळे पेट्रोल १०.४८ रुपयांनी तर डिझेल ७.१६ रुपयांनी स्वस्त झाला आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीला १२०० कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. असे असले तरी यामुळे सर्वसामान्यांन महागाईतून दिलासा मिळेल असा विश्वास गेहलोत सरकारने व्यक्त केला आहे.

भाजप शासित राज्यांवर दबाव

दरम्यान केरळनेही पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे २.४१ रुपये आणि १.३६ रुपये कमी केले आहेत. दोन्ही बिगर भाजप शासित राज्यांनी कर कमी केल्याने आता भाजपशासित राज्यांवर इंधनावरील दर कमी करण्याचा दबाव आहे.  

केंद्र सरकारने कमी केल्या किंमती

यापूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील ८ रुपये आणि ६ रुपये कमी केले होते. त्यामुळे पेट्रो. ९.५० रुपयांनी तर डिझेलच्या किंमती ७ रुपयांनी कमी झाल्या आहेत. तसेच एलपीजी सिलिंडर २०० रुपये अनुदान देण्याचेही जाहीर केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी