Petrol Diesel Pump Owners Agitation : पेट्रोल पंप चालकांचं आंदोलन; इंधन खरेदी न करण्याचा निर्णय, पेट्रोल पंप मात्र सुरू राहणार

आज ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशन (All India Petrol Pump Association) केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध निषेध नोंदवणार असून पेट्रोल पंप डीलर्स (Petrol Pump Dealers) आज पेट्रोल-डिझेलची (Petrol Diesel) खरेदी तेल कंपन्यांकडून करणार नाही.

Agitation of petrol pump drivers; The decision not to buy fuel
पेट्रोल पंप चालकांचं आंदोलन  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • देशभरातील इंधन दराच्या मुद्यावरून पेट्रोल पंप चालक-मालकांनी हा निर्णय घेतला.
  • पेट्रोल पंप चालकांची खरेदी बंद असली तरी पेट्रोल पंप सुरू राहणार.
  • प्रवास खर्चात वाढ झाल्यानं महागाई देखील वाढली.

Petrol Pump Owners Agitation : आज ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशन (All India Petrol Pump Association) केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध निषेध नोंदवणार असून पेट्रोल पंप डीलर्स (Petrol Pump Dealers) आज पेट्रोल-डिझेलची (Petrol Diesel) खरेदी तेल कंपन्यांकडून करणार नाही. देशभरातील इंधन दराच्या मुद्यावरून पेट्रोल पंप चालक-मालकांनी हा निर्णय घेतला आहे. पेट्रोल पंप मात्र सुस्थितीत सुरू राहणार आहेत, त्यामुळे पेट्रोल-डिझेलची विक्री पंपांवर सुरुच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. 

आज जरी पेट्रोल पंप चालकांची खरेदी बंद असली तरी पेट्रोल पंप सुरू राहणार असल्यामुळे नागरिकांना काळजी करण्याची गरज नाही, कारण त्यांना नियमित इंधन मिळणार आहे, त्यामुळे ग्राहकांना कोणताही फटका बसणार नसल्याचं असोसिएशनकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 

 केंद्र सरकारचा निषेध, इंधन खरेदीवर बहिष्कार कशासाठी?

देशात वाढलेले पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार टीका झाली. प्रवास खर्चात वाढ झाल्यानं महागाई देखील वाढू लागली. काही दिवसांपूर्वी तर महागाईनं आजवरचा उच्चांक गाठल्याची आकडेवारीत देखील समोर आली होती. दरम्यान, या साऱ्या घडामोडींमध्ये केंद्र सरकरानं पेट्रोल - डिझेलच्या दरात मोठी कपात केली. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देखील मिळाला. पण, त्यामुळे पेट्रोल-डिझेल पंप चालक-मालक मात्र आक्रमक झाले आहेत. सरकारनं घेतलेल्या या निर्णयानंतर सर्वांना हजारो कोटींचा फटका बसल्याचे आकडे देखील समोर आले आहे. 

देशातील पेट्रोल -डिझेल चालक मालकांचा मोठा निर्णय

या साऱ्या घडामोडींमध्ये मात्र केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील पेट्रोल - डिझेल चालक मालकांनी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार देशभरातील चालक - मालक 31 मे रोजी तेल कंपन्यांकडून किंवा ऑईल डेपोमधून पेट्रोल -डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचावे किंवा ते पोहोचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचं 'फामपेडा'चे अध्यक्ष उदय लोध यांनी यापूर्वी म्हटलं होतं. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी