जिवंत आहे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन, मृत्यूची बातमी एम्सने नाकारली

26 एप्रिल रोजी छोटा राजन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. २०१५ध्ये त्याला इंडोनेशियामधून अटक करण्यात आली होती. तो दिल्लीच्या तिहार तुरूंगात कैद होता.

underworld don chhota rajan dies due to covid 19 at aiims
जिवंत आहे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन 

थोडं पण कामाचं

  • 26 एप्रिल रोजी छोटा राजन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले.
  • २०१५ध्ये त्याला इंडोनेशियामधून अटक करण्यात आली होती. तो दिल्लीच्या तिहार तुरूंगात कैद होता.
  • जिवंत आहे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड गँगस्टर छोटा राजनचा मृत्यू दिल्लीच्या एम्समध्ये झाल्याची बातमी आली होती. त्याला एम्सने नकार देण्यात आला. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन अजूनही जिवंत आहे, असे एम्सच्या वतीने सांगण्यात आले. 

कोविड १९ च्या उपचारासाठी त्याला एम्समध्ये दाखल केले आहे. त्याला कोरोना विषाणूची लागण झाली होती. दिल्लीच्या तिहार कारागृहात जेरबंद असलेल्या छोटा राजनला कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले होते. राजेंद्र निकाळजे  उर्फ ​​छोटा राजन याला  26 एप्रिल रोजी एम्समध्ये दाखल केले होते.  छोटा राजनला २०१५ मध्ये इंडोनेशियातून अटकेनंतर तो नवी दिल्लीच्या उच्च सुरक्षा असलेल्या तिहार तुरूंगात कैद करण्यात आले होते. आहे.

२६ एप्रिल रोजी तिहार कारागृहातील एका अधिका्याने सत्र कोर्टाला सांगितले की, कोविड १९ चा  संसर्ग झाल्यामुळे गुंडाला सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायाधीशांसमोर हजर करता येणार नाही. राजन याच्यावर खंडणी व हत्येप्रकरणी महाराष्ट्रात किमान 70 फौजदारी खटल्यांचा आरोप आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी