रशियाच्या लसीबाबत एम्सच्या अधिकाऱ्यांचे मोठे विधान

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 12, 2020 | 16:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

Russia Corona Vaccine: एम्स दिल्लीचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी रशियाने निर्माण केलेल्या कोरोना लसीच्या सुरक्षा आणि साईड इफेक्टबद्दल तपासणी करण्याचे गरज असल्याचे म्हटले आहे. 

corona vaccine
रशिया लस: एम्सच्या अधिकाऱ्यांचे मोठे विधान 

थोडं पण कामाचं

  • या लसीच्या सुरक्षिततेपासून ते साईड इफेक्टपर्यंत तपासणी करणे गरजेचे आहे.  
  • दिल्ली एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी मोठे विधान केले आहे
  • जगभरात आतापर्यंत साडे सात लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई: रशियाने(russia) कोरोनावर लस(vaccine on corona) शोधून काढल्याचे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन(russia president vladimir putin) यांनी दावा केल्यानंतर संपूर्ण जगभरातून यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. दिल्ली एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया(AIIMS Delhi Director Randeep Guleria)यांनी सांगितलेकी या लसीच्या सुरक्षिततेपासून ते साईड इफेक्टपर्यंत तपासणी करणे गरजेचे आहे.  

विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटना(WHO) पासून ते अमेरिका आणि जर्मनीसारखे देशही रशियाने विकसित केलेल्या लसीबाबत संशय व्यक्त करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की रशियाकडून या लसीबाबत महत्त्वाचा डेटा सादर केला जात नाही आहे. जगातील अनेक देश कोरोनावरील लस निर्मितीचेकाम करत आहे. भारतातही या लसीच्या मानवी चाचणीला सुरूवात झाली आहे. 

एम्स डायरेक्टर म्हणाले, सुरक्षेची पडताळणी महत्त्वाची

गुलेरिया म्हणाले, आम्हाला बघावे लागेल की रशियाने विकसित केलेली ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे की नाही. सुरक्षित आहे याचा अर्थ त्यामुळे कोणते साईडइफेक्ट होणार नाहीत आणि प्रभावी म्हणजे या लसीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते की नाही. जर या दोन्ही गोष्टी लसीमुळे होत असतील तर ते मोठे पाऊल असेल. भारताकडे मोठ्या प्रमाणात उत्पादनाची क्षमता आहे. यामुळे ही चाचणी अधिक सुलभ आणि प्रभावी असेल. तसेच लवकर होईल. 

जगात दोन कोटीहून अधिक रुग्ण

जगभरात कोरोनाचे दोन कोटीहून अधिक रुग्ण झाले आहे. या आजारामुळे जगभरात आतापर्यंत साडे सात लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.भारतात कोरोनाबाधितांची संख्या २३ लाख इतकी आहे. जगातील अनेक देश कोरोना लसीची निर्मिती करत आहेत. 

रशियाच्या लसीमध्ये २० देशांनी दाखवला उत्साह

रशियाने विकसित केलेल्या कोरोना लसीबाबत भारतासह जगभरातील २० देशांनी याबाबत उत्साह दाखवला आहे. या लसीचे २० कोटी डोस बनवण्याची तयारी केली जात आहे यात ३ कोटी केवळ रशियाच्या लोकांसाठी असेल.रशियाने नोव्हेल कोरोना व्हायरसवर त्यांनी तयार केलेल्या लसीचे नाव सोव्हिएत संघाच्या स्पुटनिक (Sputnik satellite) या उपग्रहावरून 'स्पुटनिक V' असं ठेवलंय. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी