कलम ३७० हटविल्यावर लाल-पिवळे झाले ओवैसी, देशात महाभारत करू इच्छिते मोदी सरकार 

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 14, 2019 | 15:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

असादुद्दीन ओवैसी यांनी कलम ३७० संदर्भात पुन्हा एकदा तोंडाने फायरिंग सुरू केली आहे. मोदी सरकारला काश्मीरवर प्रेम आहे पण काश्मिरी नागरिकांशी प्रेमभाव नाही. जर त्या ठिकाणी लोक आनंदी आहेत तर त्यांना घरात कैद का करू

Asaduddin Owaisi
एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवैसी 

थोडं पण कामाचं

  • काश्मीरच्या परिस्थितीवर असादुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारला घेरले 
  • मोदी सरकारचे काश्मिरी जनतेशी नाही काश्मीरवर प्रेम
  • कलम ३७० हटविल्यावर लोक खुश आहेत तर ८० लाख लोक घरात कैद का आहेत. 

नवी दिल्ली :  कलम ३७० आता इतिहास झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना म्हटले की, जम्मू-काश्मीरला केंद्र शासित बनविण्याचा निर्णय कायम स्वरूपी नाही. त्यांनी सांगितले की स्थिती सामान्य झाल्यावर त्याला पुन्हा राज्याचा दर्जा देण्यात येणार आहे. पण विरोधी पक्ष आरोप लावत आहे की काश्मीर खोऱ्यात परिस्थिती सामान्य नाही आहे. 

असादुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे की काश्मिरात जर शांतता आहे तर अजूनही ८० लाख लोक घरात नजरकैद का आहेत. जर लोक खुश आहेत तर त्यांना रस्त्यावर येण्यास रोखले का जात आहे. ते म्हणाले, मोदी सरकारला काश्मीरबाबत प्रेम आहे, पण काश्मिरी जनतेबाबत त्यांना प्रेम नाही आहे. त्यांना माहिती आहे की मोदी सरकारला काश्मीरच्या जमिनीशी प्रेम आहे. लोकांना त्यांच्या बिकट परिस्थितीवर सोडण्यात आले आहे. 

 

 

सध्याचे सरकार ताकदीच्या जोरावर गोष्टी करत आहेत. न्याय शब्द या लोकांच्या शब्दकोषातून गायब झाला आहे. तो कोणत्याही पद्धतीत सत्तेत राहू इच्छित आहे. पण त्यांना मी आज आठवण करून देतो की कोण कायम स्वरूपी जिवंत राहत नाही कोणतीही सत्ता कायम एका व्यक्तीकडे राहत नाही. त्यानी मग हे पण सांगावे की पांडव आणि कौरव कोण आहेत, काय तुम्ही या देशात पुन्हा एक महाभारत घडवू इच्छितात, अशी तोफ पुन्हा ओवैसी यांनी डागली आहे. 

 

 

 

रागाने लाल झालेले ओवैसी म्हणाले,  जे लोक मोदी विरोधी आहे त्यांना वाटते की ते देशद्रोही आहेत, पण मी सांगू इच्छितो, मोदींचा विरोध करणारी व्यक्ती देशद्रोही कशी होऊ शकते. काश्मीरमध्ये आवश्यक सेवांवर बंदी घालण्यात आली आहे आणि सरकारचे म्हणणे आहे की स्थिती सामान्य आहे. मी दाव्याने सांगतो की कलम ३७० हे असंविधानिक पद्धतीने हटविण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
कलम ३७० हटविल्यावर लाल-पिवळे झाले ओवैसी, देशात महाभारत करू इच्छिते मोदी सरकार  Description: असादुद्दीन ओवैसी यांनी कलम ३७० संदर्भात पुन्हा एकदा तोंडाने फायरिंग सुरू केली आहे. मोदी सरकारला काश्मीरवर प्रेम आहे पण काश्मिरी नागरिकांशी प्रेमभाव नाही. जर त्या ठिकाणी लोक आनंदी आहेत तर त्यांना घरात कैद का करू
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...